By  
on  

बेबो करीना कपूर खानने परिवारासोबत असा केला वाढदिवस साजरा

आज म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी करीना कपूर खान 40 वर्षांची झाली आहे. आता कपूर परिवार म्हटलं की वाढदिवस आणि सण-उत्सव एकत्र साजरे करतातच. तसचं करीनाचा वाढदिवसही दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्ताने करीनाचे आई-वडिल बबिता आणि रणधीर कपूर यांच्यासह पति सैफ अली खान आणि बहिण करिश्मा कपूर ही परिवार मंडळी उपस्थित होती.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Birthday girl ️️️ we love you #happybirthday

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

 

 करीनाच्या वाढदिवसानिमित्ताने यावेळी खास केकही होता. करीनाच्या केकवर फॅब्युलस एट 40 असं लिहीलं होतं. यावेळी करीनाने तिच्या फॅमिलीसोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं आहे. बहिण करिश्माने करीनाच्या वाढदिवसांच्या सेलिब्रेशनचे खास फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. शिवाय सोशल मिडीयावरही करीनाला तिच्या चाहत्यांनी आणि मित्रमंडळींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Her look is fabulous #kareenakapoorkhan @kareenakapoorkhan ️️️

A post shared by kareenakapoorkhan (@kareenakapoor774) on

 

यावेळी या वाढदिवसाचं सेलिब्रेशन घऱीच करण्यात आलं. 

Recommended

PeepingMoon Exclusive