By  
on  

PeepingMoon 2020 : या मराठी कलाकारांनी केला यशस्वी वेब डेब्यू, ओटीटीवर केलं पदार्पण 

2020 मध्ये लॉकडाउनचा काळ मोठा होता. त्यामुळे हे वर्ष लॉकडाउनमध्येच गेलं असही म्हणता येईल. मात्र या काळात घरात बसून करायचं काय तर मनोरंजनासाठी अनेकांनी वेब प्लॅटफॉर्मचा वापर केला. यात अनेक वेब सिरीज आणि ओटीटीवर अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. अनेक मराठी कलाकारांनी या काळात वेब डेब्यु केला. या कलाकारांच्या हिंदीसह मराठी वेबसिरीजही चर्चेत राहिल्या.

रिंकू राजुगुरु – हंड्रेड 
अभिनेत्री रिंकू राजगुरुने वेब एन्ट्री घेतली आणि पहिल्याच प्रयत्नात तिला यश मिळालं. रिंकूने ओटीटी प्रोजेक्टमधूनही सगळ्यांची मनं जिंकली. ‘हंड्रेड’ या वेब सिरीजमधून रिंकूने वेब प्लॅटफॉर्मवर एन्ट्री केली. या वेब सिरीजमध्ये रिंकू अभिनेत्री लारा दत्तासोबत झळकली. रिंकूचा सहज सुंदर अभिनय यात भाव खाऊन गेला. रिंकू अनपॉज्ड या हिंदी सिनेमातही झळकली आहे. हा सिनेमादेखील ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे.   


 
स्वप्निल जोशी – समांतर
टेलिव्हिजन आणि मराठी सिनेमे गाजवणारा मराठीतला रोमान्स किंग म्हणून ओळख असलेल्या स्वप्निल जोशीची देखील याच वर्षी वेब प्लॅटफॉर्मवर एन्ट्री झाली. ‘समांतर’ या वेब सिरीजमधून स्वप्निल प्रेक्षकांच्या भेटीला आला. सुहास शिरवळकर यांच्या ‘समांतर’ या कादंबरीवर आधारित या रहस्यमयी वेबसिरीजमध्ये स्वप्निलने कुमार महाजनची भूमिका साकारली. लॉकडाउनच्या काळात वेबसिरीज प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांचाही भरगोस प्रतिसाद या वेबसिरीजला मिळाला. लवकरच या वेबसिरीजचं दुसर सिझनही नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे 

तेजस्विनी पंजित - समांतर
‘समांतर’ या वेबसिरीजमधून अभिनेत्री तेजस्विनी पंडितने वेब विश्वात पदार्पण केलं. या सिरीजमध्ये अभिनेता स्वप्निल जोशी साकारत असलेल्या कुमार महानजच्या पत्निच्या भूमिकेत तेजस्विनी दिसली. या सिरीजमध्ये तेजस्विनीचा नॉन ग्लॅमरस लुक पाहायला मिळाला. या सिरीजच्या दुसऱ्या सिझनमध्येही तेजस्विनी झळकणार आहे. 

आदिती पोहणकर – शी, आश्रम
यावर्षी ‘शी’ या वेबसिरीजची प्रचंड चर्चा झाली. आदिती पोहणकरच्या कामाचंही कौतुक झालं. आदितीने या सिरीजमध्ये एका महिला पोलीस अधिकारीची भूमिका साकारली आहे. याशिवाय आदिती ‘आश्रम’ या सिरीजमध्येही दिसली. या सिरीजमधूनही आदितीने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. या सिरीजमध्ये अभिनेता बॉब देवल मुख्य भूमिकेत आहे. 

अश्विनी भावे – द रायकर केस
‘द रायकर केस’ या वेब सिरीजमधून प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे या देखील वेब विशवात पदार्पण करताना दिसल्या. या सिरीजची कथा एका कुटुंबाभोवती फिरत असून ही एक सस्पेन्स थ्रिलर सिरीज आहे. त्यांची या सिरीजमध्ये साक्षी नायक रायकर ही व्यक्तिरेखा आहे. यावर्षी या सिरीजचीही प्रचंड चर्चा झाली होती. 

ललित प्रभाकर – द रायकर केस
अभिनेता ललित प्रभाकरनेही यावर्षी वेब विश्वात पदार्पण केलं. ‘द रायकर केस’ या रहस्यमयी थ्रिलर सिरीजमध्ये तो दिसला. या सिरीजमधील रहस्य आणि थरारने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं.

मनवा नाईक – द रायकर केस
अभिनेत्री मनवा नाईकनेही ‘द रायकर केस’ या सिरीजमधून वेब विश्वात एन्ट्री केली. या सिरीजमध्ये मनवा आनंदी आपटेची व्यक्तिरेखा साकारतेय.

श्रेया बुगडे – बायकोला हवं तरी काय
‘बायकोला हवं तरी काय’ या वेब सिरीजमधून कॉमेडी क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली श्रेया बुगडे वेब प्लॅटफॉर्मवर दिसली. श्रेया या सिरीजमध्ये श्रेया नावाच्या गृहीणीच्या भूमिकेत दिसतेय. पतिच्या विचित्र वागणुकीमुळे त्रस्त असलेली त्याची पत्नी आपल्या पतिला बदलण्यासाठी ती कृष्णाकडे विनवणी करते. त्यानंतर जे घडत जातं ते पाहणं रंजक ठरतं. ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या श्रेयाचा विनोदी अंदाज या वेब सिरीजमध्येही पाहायला मिळतोय.  

अनुजा साठे – एक थी बेगम
यावर्षी अभिनेत्री अनुजा साठेने ‘एक थी बेगम’ या सिरीजमधून एक आव्हानात्मक भूमिका साकारली. या सिरीजमध्ये अनुजा मुख्य भूमिकेत दिसली आणि सगळ्यांचं लक्ष वेधलं. आपल्या पतिच्या हत्येनंतर सूड घेण्यासाठी अश्रफ ही माफिया क्वीन सपना कशी बनते हा प्रवास यात दाखवला आहे.  या सिरीजमधील अनुजाच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक करण्यात आलं आहे. खऱ्या कहाणीपासून प्रेरिस असलेल्या या सिरीजला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला होता.  लवकरच या सिरीजचं दुसर सिझनही प्रेक्षकांच्या भेटीला येईल.


गश्मीर महाजनी – श्रीकांत बशीर
हँडसम हंक अभिनेता गश्मीर महाजनीनेही यावर्षी वेब विश्वात पदार्पण केलं. ‘श्रीकांत बशीर’ या एक्शन पॅक ड्रामात गश्मीर झळकतोय. एका सर्जीकल ऑपरेशन टीमच्या एक्शनचा थरार यात अनुभवायला मिळतोय. या सिरीजमधील स्टंट्स हे बॉडी डबलचा वापर न करता स्वत: गश्मीरने केले आहेत. या सिरीजमध्ये गश्मीर आणि अभिनेता युधिष्टिर सिंह यांची जोडी दाखवण्यात आली आहे.  

पुष्कर जोग – इडियट बॉक्स, सनम हॉटलाईन
‘इडियट बॉक्स’ या वेबसिरीजमध्ये अभिनेता पुष्कर जोगने गेस्ट अपिअरन्स केला आहे. मराठी बिग बॉसमध्ये झळकलेला पुष्कर या सिरीजमध्येही बिग बॉस फेम अभिनेत्याच्या भूमिकेत दिसला. या सिरीजमध्ये त्याचा गेस्ट अपिअरन्स चांगलाच भाव खाऊन गेला. याशिवाय ‘सनम हॉटलाईन’ या वेब सिरीजमध्येही पुष्कर झळकतोय. या सिरीजमध्ये मराठी बिग बॉसमधील एक्स स्पर्धक सई लोकूर आणि पुष्कर एकत्र पाहायला मिळत आहेत. 

सई लोकूर – सनम हॉटलाईन
मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूरनेदेखील वेब विश्वात पदार्पण केलं. ‘सनम हॉटलाईन’ या सिरीजमधून सईने ओटीटीवर एन्ट्री घेतली आहे. या विनोदी सिरीजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

 प्रियदर्शन जाधव – भुताटलेला 
‘भुताटलेला’ या हॉरर कॉमेडी वेब सिरीजमधून अभिनेता प्रियदर्शन जाधवचं वेब विश्वात पदार्पण झालं. यात प्रियदर्शन रायबाच्या भूमिकेत आहे.

सुरभी हांडे – भुताटलेला 
भुताटलेला या हॉरर कॉमेडी सिरीजमध्ये अभिनेत्री सुरभी हांडे झळकली होती. या सिरीजमध्ये सुरभी अभिनेता प्रियदर्शन जाधवसोबत झळकली. 

शिवानी रांगोळे  - शी, इडियट बॉक्स

अभिनेत्री शिवानी रांगोळे यावर्षी चर्चेत राहिलेली वेब सिरीज ‘शी’ मध्ये झळकली. त्यानंतर ‘इडियट बॉक्स’ या वेबसिरीजमध्ये शिवानीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. या सिरीजमधून शिवानीने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं.

Recommended

PeepingMoon Exclusive