Brothers Day Special : ही आहेत मालिका विश्वातील ऑनस्क्रिन फेमस भावंडं

By  
on  

मालिकांमध्ये विविध नाती दाखवली जातात. कौटुंबिक मालिकांमध्ये तर अगदी एकत्र कुटुंब पद्धतीही दाखवल्या जातात. या सगळ्यात भांवंडांची पात्रही तितकचीच लक्षवेधी ठरतात. भावंडांचं एकमेकांवर असलेलं प्रेम, घराला असलेला त्यांचा मोठा आधार या सगळ्या गोष्टी या मालिकांमधून पाहायला मिळतात. भाऊ प्रत्येकाच्या आयुष्यातील एक जवळचं नातं, हे नातं जेव्हा मालिकांमध्ये पाहायला मिळतं तेव्हा मग त्या पात्रांविषयी आपुलकी निर्माण होत असते. अशाच काही मराठी मालिका आहेत ज्यात भावांच्या भूमिकेतील काही कलाकार लक्ष वेधून घेत आहेत.

'आई कुठे काय करते'

या मालिकेत अभिषेक आणि यश हे दोघं भाऊ दाखवलेत. छोटी बहीण इशाची ते दोघही काळजी घेतात. एक भाऊ समंजस आहे तर दुसरा मोकळ्या स्वभावाचा बोलका भाऊ. अशी ही दोन्ही पात्र या कलाकारांनी उत्तम साकारल्या आहेत. अभिनता अभिषेक देशमुख या मालिकेत यशच्या भूमिकेत आहे. तर निरंजन कुलकर्णी अभिषेकची भूमिका साकारतोय.

घरातील वडीलधाऱ्या माणसांनंतर सगळी जबाबदारी दोघं घेण्याचा उत्तम प्रयत्न करताना दिसतात. या दोघांमधील नातंही वेगळं आहे. वेगवेगळ्या स्वभावाचे ही भावंडं घरावर कोणतं संकट आलं की खंबीरपणे उभी राहिलेली दिसतात. 

'रंग माझा वेगळा'

या मालिकेत कार्तिक आणि आदित्य या भावांची जोडी आहे.  या दोघांवर घरची मोठी जबाबदारी दाखवण्यात आली आहे. कार्तिक हा डॉक्टर आहे तर आदित्य हा घरच्या बिझनेसचं कामकाज पाहतो. मात्र दोघंही समजुतदार आहेत. मोठा भाऊ कार्तिक आपल्या छोटा भाऊ आदित्यची नेहमी काळजी घेताना दिसतो. अभिनेता आसुतोष गोखले कार्तिकच्या भूमिकेत आहे. तर अंबर गणपुळे आदित्यची भूमिका साकारतोय. या दोन्ही पात्री अतीशय वेगळी आहेत. या मालिकेतील या कलाकारांच्या अभिनयकौशल्याने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 

'सहकुटुंब सहपरिवार'

ही मालिका तर भावंडांच्या नात्यावर प्रकाश टाकणारी आहे. एकत्र राहत असलेले चार भाऊ त्यांच्या पत्नी असं हे कुटुंब आहे. यात मतभेद होत असले तरी मोठ्या भावाच आदेश आहे महत्त्वाचा मानला जातो. मोठ्या भावाला आदर दिला जातो. अभिनेता सुनील बर्वे, आकाश नलावडे, अमेय बर्वे आणि आकाश शिंदे हे कलाकार भावंडांच्या भूमिकेत आहेत. सुनील बर्वे यात मोठ्या भावाची भूमिका साकारत आहेत.

कलाकारांची जशी ऑनस्क्रिन बॉंडिंग आहे, तसेच हे कलाकार ऑनस्क्रिनही जवळचे मित्र बनलेत. मालिकेसाठी एकत्र शूट करताना या कलाकारांचं हे जणू कुटुंबच तयार झालय. या भावंडांचं कुटुंबासाठी असलेलं प्रेम, आपल्या भावाला बहिणीला सांभाळण्याची घेतलेली जबाबदारी आणि कायम खंबीर राहून कुटुंबाचा आधारस्तंभ बनून राहिलेली ही भावंडं मंडळी आणि कलाकारांनी साकरलेली ही भावांची पात्रे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत.

Recommended

Loading...
Share