By  
on  

Exclusive : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहून लेक म्हणते 'बाबा, ते पाहा तुम्ही' - शरद केळकर

छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंह शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित अजय देवगण स्टारर ‘तानाजी द अनसंग वॉरियर’ सिनेमा रसिकांच्या भेटीला येतोय.स्वराज्यातील कोंढाणा किल्ला मुघलांच्या तावडीतून सोडवण्यासाठी जीवाची बाजी लावतो. स्वराज्याच्या शूर शिलेदारांचा उल्लेख जेव्हा होतो, त्यावेळी नरवीर तानाजी मालसुरेचं नाव आवर्जुन घ्यावं लागतं.

अभिनेता शरद केळकर सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. फर्स्ट लुक उलगडल्यापासूनच शरद केळकरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या सिनेमानिमित्ताने अभिनेता शरद केळकरने पिपींगमून मराठीसह केलेली ही खास बातचित. 

 

   
 ‘तानाजी द अनसंग वॉरियर’च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना जो गौरवास्पद मानाचा मुजरा केला तो किस्सा ऐकायला आवडेल? 

उत्तर :  मी बोलण्यात गुंग होतो. अचानक माझ्यासाठी प्रश्न विचारण्यात आला आणि नकळत हद्यातून ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे उद्गार माझ्या तोंडून आले. त्यावेळेस उत्तर देताना प्रश्न विचारणा-यांबद्दल कुठल्याही प्रकारची उध्द्ट भावना माझ्या मनात नव्हती. तो मान तो अभिमान थेट हद्यातून आला. कुठल्याही महान व्यक्तीमत्त्वासाठी आदर हा असायलाच हवा.ज्यांनी आपल्याला इतकं काही दिलंय, त्यांच्याकडून आपण शिकलोय, त्यांचा एकेरी उल्लेख करणं चुकीचंच आहे. आपणच पुढच्या पिढीसमोर तो आदर्श ठेवायला हवा असं माझं मत आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तू आहेस हे पहिल्यांदा जेव्हा तुला समजलं तेव्हा तू काय प्रतिक्रिया दिलीस आणि व्यक्तिरेखेसाठी तू कसा अभ्यास केलास? 

उत्तर :   छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं तेव्हा मला पहिल्यांदाच धक्काच बसला. कारण मराठीतसुध्दा अनेक सर्वोत्तम कलाकारांनी ही भूमिका गाजवलीय. डॉ.अमोल कोल्हे असतील, चिन्मय मांडलेकर असेल. त्यामुळे थोडं दडपण होतं पण दिग्दर्शक ओम राऊत मला म्हणाला,पण मला मात्र माझे राजे तुझ्यात दिसतात. राजेंच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वात तुच मला शोभून दिसतोय. तेव्हा मी लुक टेस्ट दिली आणि सर्वांच्या प्रतिक्रीया जेव्हा मिळाल्या तेव्हा अर्धी परिक्षा मी जिंकलो होतो. 
ओमने जशाप्रकारे सिनेमासाठी मेहनत घेतलीय, जो अभ्यास केलाय, तीन वर्ष तर तो फक्त या सिनेमाच्या स्क्रिप्टवरच काम करतोय त्यामुळे कुठलेही तर्कवितर्क न मांडता मी स्वत:ला त्याच्याकडे सोपवून दिलं. प्रत्येक सीनपूर्वी तो माझ्याजवळ यायचा 7-8 मिनीटं राजेंबद्दल इतकं झंझावात  बोलायचा आणि मला त्याच काळात घेऊन जायचा, त्या गोष्टींचा प्रभाव इतका व्हायचा की आपसूकच माझी सीनसाठी परिपूर्ण तयारी व्हायची.  

 

तुमची लहानशी  लेक केशाने जेव्हा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या लुकमध्ये पहिल्यांदा पहिलं? 

उत्तर :   माझी लेक केशा खुप लहान आहे, अगदी पाच वर्षांची. तिने जेव्हा मला पहिल्यांदा महाराजांच्या व्यक्तिरेखेत पाहिलं तेव्हा तिला खुप अप्रुप वाटलं. ती नेहमी महाराजांच्या लुकमधील माझा फोटो पाहते. मी पहिल्यांदाच ऐतिहास भूमिकेत आहे. मग मी तिल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तिच्याच भाषेत थोडक्यात ओळख करुन दिली.  
सिनेमाच्या अनाऊंसमेन्टनंतर आम्ही एकदा संपूर्ण कुटुंब गेटवेजवळ फिरायला गेलो होतो, तेव्हा तिथे छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहून केशा लगेच ओरडली, “बाबा, ते पाहा तुम्ही”. ते ऐकून तिच्या निरागसतेवर खुपचं हसू आलं. पण माझी अशी इच्छा हे की,तिने मोठं होऊन संपूर्ण मराठा इतिहास जाणून घ्यावा.  

जर मराठी सिनेमांमध्ये तुम्हाला एखादी ऐतिहासिक भूमिका करण्याची संधी मिळाली तर तुम्ही स्विकारणार का? 

उत्तर :  हो संधी मिळाली तर का नाही करणार. मला खुप आवडेल मराठीत ऐतिहासिक भूमिका साकारायला . आपली भाषा आपला अभिमान आहे. महेश मांजरेकर सरांसोबत सुरु आहे बोलणं, बघू आता गोष्टी कशा वर्कआऊट होतात. 

 छत्रपती शिवाजी महाराजांचे शूरवीर योध्दा ’तानाजी’च्या शौर्याचा अनुभव प्रेक्षकांना पडद्यावर 10 जानेवारी 2020ला रोजी येणार आहे.  
 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive