By  
on  

सविता प्रभुणे यांच्या लेकीचे फोटो पाहून तुम्ही म्हणाल वॉव

सविता प्रभुणे या नावाची मराठी सिनेसृष्टीला खास ओळख करुन देण्याची गरज नाही. सालस चेहरा आणि निखळ हास्य असलेल्या या अभिनेत्रीने आजवर अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. कळत नकळत, छक्के पंजे, लपंडाव अशा सिनेमांमधून त्यांनी अभिनयाची छाप पाडली आहे.

याशिवाय तेरे नाम, फिजा, हायवे या हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं आहे. याशिवाय पवित्र रिश्ता, कुसुम, जावई विकत घेणे आहे, खुलता कळी खुलेना या हिंदी मराठी मालिकांमध्ये सविताताईंनी काम केलं आहे.

सविता यांची लेक सात्विका प्रभुणेदेखील तितकीच सुंदर आहे. सात्विका मॉडेलिंग करते. सध्या तरी ती मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावत आहे.

तिच्या या सुंदर फोटोंना सोशल मिडियावरही बरेच लाईक्स मिळत असतात. सविता ताईंप्रमाणेच सात्विकाच्या अदाकारीची जादू रसिकांना आजमावयला मिळेल यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive