By  
on  

अशोक सराफ- पद्मिनी कोल्हापुरे यांच्या ‘प्रवास’च्या स्क्रिनिंगला बॉलिवूडकरांची हजेरी

अशोक सराफ- पद्मिनी कोल्हापुरे अभिनीत प्रवास सिनेमाचं स्क्रिनिंग नुकतंच पार पडलं. या स्क्रिनिंगला बॉलिवूड कलाकारांनीही हजेरी लावली होती. मावशी पद्मिनी कोल्हापुरेच्या सिनेमाला शुभेच्छा देण्यासाठी अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही हजेरी लावली होती. 
याशिवाय आशा भोसले, जुही चावला, महेश कोठारे, अशोक –निवेदिता सराफ तर पद्मिनी आपल्या मुलांसोबत दिसून आल्या. हिंदीतील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी सलीम सुलेमान यांचा मराठी सिनेसृष्टीतला ‘प्रवास’ या निमित्ताने सुरु झाला आहे. पद्मिनी यांचाही पहिलाच मराठी सिनेमा आहे. हा सिनेमा 14 फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive