दिग्दर्शक: अरुणा राजे
कलाकार: उषा जाधव,राजेश्वरी सचदेव,सचिन खेडेकर, गिरीश कुलकर्णी
वेळ: 2 तास
रेटींग: 3 मून
मराठीत आजवर अनेक स्त्री प्रधान सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. या सिनेमांमध्य़े नेहमीच विविध विषय हाताळले जातात. ह्यात संवेदनशील सिनेमांचा अधिक समावेश असल्याचं पाहायाला मिळालंय. देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या पर्पल पेबर पिक्चर्स हे प्रोडक्शन हाऊस ने व्हेंटिलेटर या कौटुंबिक सिनेमाच्या जबरदस्त यशानंतर आता एका वेगळ्या वाटेवरचा फायरब्रॅण्ड दुसरा मराठी सिनेमा घेऊन प्रेक्षकांसमोर आले आहे, त्यात हा सिनेमा नेटफ्लिक्स या डिजीटल प्लॅटफॉर्मवरच उपलब्ध असल्याने सिनेमाबबातची उत्सुकता आणखी वाढलीय.
कथानक
कौटुंबिक न्यायालयातील एक महिला वकील आणि तिच्या कार्किर्दीत येणा-या कौटुंबिक केसेस ह्याभोवती या सिनेमाची कथा गुंफण्यात आली आहे. सुनंदा (उषा जाधव) ही न्यायनिष्ठ वकील. प्रत्येकाला आपल्या हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी झटणारी व आपल्या कामाशी प्रामाणिक राहणारी. पण या सुनंदाच्या वैयक्तिक जीवनात पूर्वी असं काहीतरी अघटित घडलंय की त्याचे चटके तिच्या मनात अजूनही धगधगतायत. त्या आठवणींच्या जखमा तिला आजही सतावतायत. तरीही ती आज उभी आहे, दुस-यांना न्याय मिळवून देण्यासाठी. न्यायालयीन प्रकरणांमध्ये सुनंदाकडे विविध प्रकारच्या केसेस आहेत. सुनंदाचा पती (गिरीश कुलकर्णी) हे आपल्या पत्नीला मागचं सर्व विसरायला लावून तिला पदोपदी साथ देताना पाहायला मिळतात. सचिन खेडेकर आणि राजेश्वरी सचदेव या उच्चभ्रू यांच्या व्यक्तिरेखांच्या कौटुंबिक वादळाचा प्रसंग सिनेमात पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दिग्दर्शन
दिग्दर्शिका अरुणा राजे यांनी ही महिला शक्तीची कथा फार संवेदनशील आणि योग्य पध्दतीने मांडली आहे. प्रत्येक प्रसंगाचे बारकावे साकारण्यात त्यांना यश मिळालं आहे.
अभिनय
राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधवच्या सशक्त अभिनयाने हा सिनेमा सजला आहे. ज्या व्यक्तीच्या जीवनात असा प्रसंग बेततो त्यालाच ते दु:ख समजतं, हे भावनिकदृष्ट्या पडद्यावर साकारण्यात उषाने कुठलीच कमतरता सोडलेली नाही. राजेश्वरी सचदेव आणि सचिन खेडेकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी सिनेमात पाहणं एक प्रकारची पर्वणीच ठरते. अभिनेते गिरीश कुलकर्णीसुध्दा आपल्या अभिनयाची छाप सिनेमात सोडतात.