By  
on  

Movie Review 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा': नाजूक विषयाची सुंदर मांडणी

दिग्दर्शक:  शेलीधर चौप्रा

कलाकार: सोनम कपूर, राजकुमार राव, अनिल कपूर

वेळ: 2 तास

रेटींग : 3.5  मून

अभिनेता अनिल कपूरचा सुपरहिट सिनेमा ‘1942 अ लव स्टोरी’ या सिनेमातील गाण्यावरुन या सिनेमाचं टायटल एक लडकी को देखा तो ऐसा लगा हे घेण्यात आलं आणि या सिनेमानिमित्ताने प्रथमच अनिल कपूर आणि सोनम कपूर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकली. सिनेमाच्या टायटलवरुन आणि सिनेमाच्या ट्रेलरवरुन ही एक नेहमीचीच लव्हस्टोरी वाटली. पण आता या सिनेमाविषयीची उत्सुकता आणखी वाढलीय. कारणही तसंच आहे, या सिनेमाने एका धाडसी विषयाला हात घातला आहे.

कथानक ही एका पंजाबी कुटुंबाची ही कहाणी आहे. सिनेमात राजकुमार राव एक लेखक आहे. तर स्वीटी म्हणजेच सोनम कपूर ही एका पारंपारिक पंजाबी कुटूंबातील मुलगी आहे. अभिनेते अनिल कपूर या तिच्या रिअल लाईफ वडीलांनी सिनेमातसुध्दा तिच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. स्वीटी लहानपणापासूनच प्रेम आणि लग्नाची स्वप्न पाहते. दरम्यान स्वीटी राजकुमार राव साकारत असलेल्या शाहीनला भेटते. सर्वांनाच म्हणजे तिच्या कुटुंबियांसकट हे वाटतं की हे दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत, पण वास्तव काहीतरी वेगळंच आहे आणि त्यावरुनच मोठं नाट्य घडतं. पण ते काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल.

दिग्दर्शन एका महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील विषयाला दिग्दर्शकाने मोठ्या पडद्यावर अगदी लिलया पेललं आहे. छोटया छोट्या प्रसंगातून संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे.

अभिनय  अनिल कपूर ह्यांची सोनम कपूर आणि राजकुमार राव यांच्यासोबत जबरदस्त केमिस्ट्री जुळून आली आहे. अनिल कपूर व जूही चोप्रा या जोडीचीसुध्दा धम्माल आहे. सर्वांनीच आपल्या अभिनयातून सिनेमात जान आणलीय.

सिनेमा का पाहावा? चाकोरीबाहेरच्या विषयाला सुंदर पध्दतीने हाताळल्यामुळे हा सिनेमा जरुर पाहावा. नाजूक विषय असला तरी आज यावर मोकळेपणानं बोलणं किती गरजेचं आहे, याासाठी सर्वांनीच तो पाहणं गरजेचं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive