By  
on  

KWK6 Preview: करिनाने प्रियांकाला दिला हा सूचक सल्ला

कॉफी विथ करणचा प्रत्येक भाग हा इंटरेस्टिंग असतो. दरवेळेस कोणते सलिब्रिटी या कार्यक्रमात हजेरी लावणार याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. कॉफीच्या येत्या भागात करणसोबत गप्पांची मैफल जमवायला दोन सौंदर्यवती अभिनयसम्राज्ञी हजर होणार आहेत. कॉफीच्या या शोमध्ये चक्क करिना कपूर खान आणि प्रियांका चोप्रा जोनास या एकत्रित मनोसोक्त मारताना पाहायला मिळणार आहेत.

प्रियांका आणि करिना यांच्यासोबतच्या गप्पांचा करणचा एक प्रोमो स्टार वर्लडच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोत करिना ही प्रियांकाला एक सल्ला देताना पाहायला मिळतेय.त्यामुळे या भाग पाहण्याची प्रत्येकजण वाट पाहतोय.

तर त्याचं झालं असं की, गप्पांदरम्यान करणने प्रियांकाला विचारलं तुला वरुण धवनबद्दल माहितीय तर हे पण माहित असणार की तो नताशा दलाल हिला डेट करतोय. यावर प्रियांकाचं उत्तर होतं,नाही.

प्रियांकाचं हे उत्तर ऐकून करिना अवाक् होत म्हणाली, वरुण धवन कोणाला डेट करतोय हे तुला माहित नाही असं कसं होऊ शकतं? म्हणजे तु आत्ता फक्त हॉलिवूड अभिनेत्यांनाच ओळखतेस,हे विसरु नकोस की तु मुळची भारतीय आहेस.

सर्वांनाच आता आघाडीच्या या दोन अभिनेत्रींचं टॉक शोमध्ये एकत्र येणं, हे कुठल्याही ट्रीटपेक्षा कमी नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive