By  
on  

Movie Review: सलमान खान फॅन्सनी 'भारत' नही देखा तो क्या देखा !

सिनेमा - भारत

दिग्दर्शक - अली अब्बास जफर

कलाकार - सलमान खान, कतरिना कैफ, दिशा पाटनी, सुनील ग्रोव्हर, जॅकी श्रॉफ आणि तब्बू

रेटींग - 4 मून  

सलमान खानचे सिनेमे म्हणजे प्रत्येक ईदला त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणीच ठरतात. अगदी वर्षभर चातकासारखे वाट पाहणारे चाहते ईदला सलमानचा सिनेमा पहिल्याच दिवशी आपल्याला कसा पाहता येईल, यासाठी धडपडत असतात. आज अखेर हया चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून यावर्षीचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे नेहमीप्रमाणेच सलमानच्या भारतची बरीच चर्चा रंगली होती. भारत हा सिनेमा कोरिअन फिल्म ओड  टू माय फादरचं हिंदी अडॉप्शन आहे.

कथानक 

भारत सिनेमाची कथा ही भारत देशाची फाळणी झाली त्या पार्श्वभूमीवर गुंफण्यात आली आहे. ही एका वडील मुलाच्या नात्यावर आधारीत गोष्ट सिनेमात रंगविण्यात आली असून वडील (जॅकी श्रॉफ) आणि मुलगा भारत (सलमान खान) यांच्यातील नाजूक बंध सिनेमात उलगडत जातात. फाळणीदरम्यान आपण दुरावल्यानंतर मुलगा भारतने कुटुंबियांची जबाबदारी सांभाळावी असं वचन ते त्याच्याकडून घेतात. सात वर्षाच्या मुलापासून ते 70 वर्षीय वयोवृध्द होण्यापर्यंतचा भारतच्या या प्रवासाचे सिनेमा पाहताना आपण साक्षीदार होतो.

या  नंतर सिनेमाचं कथानक वेगानं पुढे जाते . भारत तारुण्यात पोहचतो. कुटुंबियांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्याच्यावर असते. ऐन तिशीत असताना तो दिशा पाटनी साकरत असलेल्या व्यक्तिरेखेसोबत ठुमेकेसुध्दा लावतो तर  दुसरीकडे कामाच्या शोधात त्याची गाठ सरकारी कंपनीत कार्यरत असणा-या मॅडम सरसोबत होते, म्हणजेच कतरिना कैफच्या व्यक्तिरेखेसोबत. यापुढे चालीशीत भारतला आपण एका नेव्ही ऑफीसरच्या भूमिकेत पाहतो. भारतच्या या संपूर्ण रंजक प्रवासात एक व्य्कती सतत त्याच्यासोबत ढाल बनून उभा असतो, तो म्हणजे त्याचा मित्र ही व्य्कतिरेखा अभिनेता सुनील ग्रोव्हरने साकारलीय.

अभिनय  सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या जबरदस्त अभिनयासोबतच जॅकी श्रॉफ, तब्बू, दिशा पाटनी, सुनील ग्रोव्हर, सोनाली कुलकर्णी ,नोरा फतेही आदी सर्वांच्याच 100 % योगदानाने हा सिनेमा सजला आहे.

सिनेमा का पाहावा?

तुम्ही जर सलमान खान फॅन असाल तर ब-याच काळानंतर सलमान खानचा हा सिनेमा तुमच्या भेटीला आला आहे, ह्यात सस्पेन्स, ड्रामा आणि रोमान्सचं पुरेपूर मिश्रण आहे. त्यामुळे हा पैसा वसूल सिनेमा तुम्ही नाही पाहिलात तर तुम्हाला उगीच चुकचुकल्यासारखं वाटेल.
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive