By  
on  

Movie Review: रणवीरच्या मनातला अंगार दिसला पडद्यावर, असा आहे ‘गली बॉय’

दिग्दर्शक: झोया अख्तर

कलाकार:रणवीर सिंग, आलिया भट, कल्की कोचालिन, विजय राज, अमृता सुभाष

निर्माते:   झोया अख्तर, फरहान अख्तर, रितेश सिधवानी

वेळ: २तास ३० मिनिट

रेटींग :  ४ मून

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा रणवीरचा ‘गली बॉय’ सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमात रणवीर एका सामान्य कुटुंबातील रॅपरची भूमिका साकारत आहे. स्वप्नांच्या पाठी धावण्याची हौस प्रत्येकालाच असते. पण पोटाची खळगी भरण्यासाठी स्वप्नांचा बळी द्यावा लागतो. पण गली बॉयमधल्या रणवीरच्या बाबतीत नेमकं काय घडतं हे सिनेमामध्ये दाखवलं आहे.  

कथानक “मुराद” (रणवीर सिंह) हा या कथेचा नायक आहे. त्याचे वडिल ड्रायव्हर आहेत. इतर आईवडिलांप्रमाणेच मुरादचे वडिलही त्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न बघत असतात. मुरादचे काका त्यालाही वडिलांप्रमाणेच ड्रायव्हरची नोकरी शोधून देतात. पण ही नोकरी त्याला विशिष्ट चौकटीपर्यंतच ठेवते. त्याच दरम्यान रणवीरचे वडिल दुसरं लग्न करतात. या सगळ्या दु:खातून जाणारा रणवीर रॅपिंग करताना स्वत:ला सुरक्षित समजू लागतो. रॅपर बनण्यात आयुष्याचं ध्येय असल्याची जाणीव त्याला होते.

 

दिग्दर्शन कलाकाराकडून काम करवून घेण्यात झोयाचा हातखंडा आहे. गली बॉयमध्ये हे दिसूनही येतं. या सिनेमाची कथा साधारण असली तरी दिग्दर्शन आणि पटकथेने तिला अधिक सशक्त केलं आहे. या सिनेमाला खास झोया टच आहे.

सिनेमा का पाहावा? हा सिनेमा मुंबईतील अंडरग्राउंड रॅपर डिव्हाईन उर्फ व्हिव्हियन फर्नांडिस आणि नेजी उर्फ नावेद शेख याच्या आयुष्यावर बेतला आहे. हा सिनेमा बघताना तुम्हाला अनेकदा पॉप्युलर रॅपर एमिनेम याच्या जीवनावर आधारलेला सिनेमा ‘8 माईल’ची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. पण बॉलिवूड्मध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच सिनेमा आहे. रणवीर आलियाची अदाकारी पाहण्याची इच्छा असलेल्यांनी हा सिनेमा अजिबात चुकवू नये. हा सिनेमा बॉलिवूडमधील माईल स्टोन असेल यात शंका नाही. रणवीरने आपण पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसचे राजा आहोत हे दाखवून दिलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive