By  
on  

टेक केअर गुड नाईट: सायबर गुन्हेगारीविषयी डोळे उघडायला लावणारा सिनेमा

दिग्दर्शक : गिरीश जयंत जोशी

कलाकारसचिन खेडेकर, इरावती हर्षे, पर्ण पेठे, महेश वामन मांजरेकर, आदिनाथ कोठारे

वेळ : 1 तास 50 मिनिटे

रेटींग :  3 मून

आज ऑनलाईनचं युग आहे.आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट एका क्लिकवर उपलब्ध असते. पण या ऑनलाईनचे जितके फायदे आहेत तितके तोटेसुध्दा आहेत. यामुळे सायबर गुन्हेगारी फोफावलीय.अनेक फसवणुकीला तंत्रज्ञामुळे सामोरं जावं लागत आहे. याच ज्वलंत प्रश्नावर भाष्य करुन डोळे उघडायला लावणारा टेक केअर गुड नाईट हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.

कथानक ऑफिसमध्ये नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यायचे नसल्याने निवृत्त होणारे अविनाश (सचिन खेडेकर ) यांची ही कथा. ते निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांतून पत्नीसोबत (इरावती हर्षे) परदेशी फिरायला जातात. परतल्यानंतर त्यांना असं लक्षात येतं, त्यांच्या बॅंकेतून 50 लाख रुपये नाहीशी झालेले असतात. सैरभैर झालेले अविऩाश याबाबत पोलिसांत तक्रार करतात. पोलिस इन्स्पेक्टर पवार (महेश मांजरेकर ) या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू करतात. दरम्यान अविनाश यांची मुलगी सानिका (पर्ण पेठे )हिची ओळख गौतम (आदिनात कोठारे) या मुलाशी होते. गौतमला सानिका आई-बाबा परदेशी असताना घरी बोलावते. पण त्याच्यामुळेच तर हे कुटुंब अडचणीत येत नाही ना, हा मोठा प्रश्न इथे उभा राहतो. या सायबर गुन्ह्याचा उलगडा कसा होतो, पोलिस कसा छडा लावतात हे सर्व या सिनेमात पाहणं रंजक ठरणार आहे.

दिग्दर्शन दिग्दर्शकाने आजच्या युगातलं तंत्रज्ञानामागच्या गैरवापराचं आणि गुन्ह्याचं भयाण वास्तव व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या मुलांना  स्वातंत्र्य दिलं जात असलं तरी तंत्रज्ञानाच्या अतिआहारी गेल्यामुळे काय परिस्थिती ओढवू शकते हे अचूक अधोरेखित केलं आहे. अभिनय सचिन खेडेकर, इरावती हर्षे, पर्ण पेठे यांनी त्यांच्या भूमिका अगदी तंतोतंत साकारल्या आहेत. सिनेमात खरी गंमत आणलीय ती अभिनेते महेश मांजरेकर यांनी. पोलिसांच्या भूमिकेत ते अगदी चपखल बसले आहेत. आदिनाथ कोठारेनेसुध्दा लहान भूमिकेमधून सिनेमात जान आणली आहे.

 

सिनेमा का पाहावा? गुन्हेगारी विषयक मालिका आणि सिनेमे पाहणा-यांना तर हा सिनेमा नक्कीच आवडेल. पण सस्पेन्सचा शेवटपर्यंत उलगडा करण्यात या सिनेमाने यश मिळवलं असल्याने व सायबर गुन्हेगारीसारखा आजचा महत्त्वाचा विषय मांडण्यात आल्याने या विकेंडसाठी हा पर्याय तुम्ही नक्कीच ठेऊ शकता!

Author

Recommended

PeepingMoon Exclusive