By  
on  

Movie Review: आभासी जगात रमलेल्या 'अश्लिल उद्योग मित्र मंडळ'च्या तरुणाची कथा

दिग्दर्शक : आलोक राजवाडे
लेखक : धर्मकीर्ती सुमंत
कलाकार : अभय महाजन, पर्ण पेठे, सई ताम्हणकर, अक्षय टांकसाळे, सायली फाटक, ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके 

मून:   2.5  मून्स 

अश्लिल नाव घेतलं की, सर्वांच्याच भुवया नेहमी उंचावतात.  मोठ्यांसमोर असं काही-बाही बोलू, वागू नये असेच संस्कार आपल्यावर लहानपणापासून झाले आहेत. पण पौंगडावस्थेत असताना किंवा तारुण्याच्या उंबरठ्यावर प्रत्येकाच्याच आयुष्यात अनेक मोहाचे क्षण येतात. मग त्याला कसं सामोरं जायचं, हे ज्याच्या-त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणूनच आज काल मुलांना लैंगिक शिक्षण बालपणापासूनच देण्यासाठी सर्वच आटा-पिटा करतात. 

अभिनेता आलोक राजवाडेचा दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नासाठी त्याने असा विषय निवडला आहे, जो सध्या तरी आपल्याकडे चाकोरीबाहेरचा समजला जातो. अद्यापतरी अशा आशयावर उघडपणे बोलायला कुणी धजत नाहीत. किंबुहना मराठी सिनेमात असे प्रयोग फार विरळाच होताना दिसतात. त्यामुळे सर्वप्रथम हे शिवधनुष्य उचल्याबद्दल आलोकचं कौतुक करायलाच हवं. 

मुलं मोठी होतात. तारुण्यात पदार्पण करतात. मिसरुड फुटू लागतं आणि अनेक अंर्तबार्ह्य बदलांना त्यांना सामोरं जावं लागतं. त्यात कामभावना, वासना या गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. मग ते आपली ती भूक भागविण्यासाठी काल्पनिक गोष्टींचा आधार घेऊ लागतात, जसं की मासिकं, इंटरनेटवरील 'तसली' पात्रं इ. तसंच काहीसं या सिनेमातल्या नायकाच्या बाबतीतही झालं, आहे. 

अश्लिल उद्योग मित्र मंडळ या सिनेमाचा नायक आतिष (अभय महाजन)  सुध्दा अगदी तसाच आहे. कामभावनेत रमणारा आणि त्या फॅण्टसी जगणारा. तो एक पुस्तक वाचून त्यातल्या एका स्त्री पात्राच्या म्हणजेच  (सई ताम्हणकर ) प्रेमात आकंठ बुडाला आहे. ते स्त्री पात्रं त्याला जळी स्थळी काष्ठी पाषाणी सर्वत्रच दिसते. ती जणू त्याच्या अवतीभवती सतत असते. खुणावत असते . पण याच कल्पानारम्य जगात रमलेल्या आतिषला ख-या जगाचं मात्र भान नसतं, त्याला खरीखुरी एक प्रेयसीसुध्दा (पर्ण पेठे) असते. पण  सतत त्या स्त्री पात्राचाच विचार त्याच्या डोक्यात घोंघावत असतो, मग खरं आयुष्य आणि आभासी आयुष्य यांचा मेळ तो कसा साधत असेल. 

हा नायक एकदा दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी  त्या स्त्री पात्राला आणण्याचे सांगतो. ही कल्पना इतर मित्र-मंडळींना पसंत पडते. त्यानुसार जाहिराती होतात. शहरभर होर्डिंग लागतात, सर्वत्र एकच चर्चा...ती येणार.... पण ती येते का? मुळात एक काल्पनिक असलेलं ते स्त्री पात्र प्रत्यक्षात कसं अवतरु शकेल? हाच मुख्य प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्हाला सिनेमा पाहूनच सापडेल. 

एका हटके विषयावरचं कथानक आणि त्याची मांडणी यात थोडा दिग्दर्शकाचा पहिलाच प्रयत्न असल्याने गोंधळ उडालेला पाहायला मिळतो. पण कलाकारांनी मात्र त्यांच्या त्यांच्या भूमिका अगदी योग्य वठवल्या आहेत. अभय महाजनने आतिषला पडद्यावर उत्तम न्याय दिलाय. तर पर्ण पेठे ,अक्षय टांकसाळे, ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके आणि सायली फाटक ह्यांच्या भूमिकासुध्दा लक्षवेधी ठरतात. पण साई ताम्हणकरच्या अभिनयाला म्हणावा तितका वाव नाही

एका वेगळ्या कलाकृतीची अनुभूती घ्यायची असेल तर तुम्ही हा सिनेमा एकदा पाहायला हरकत नाही. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive