By  
on  

पाहा Video : कीर्ती थांबवू शकेल का जिजी अक्कांना होणारी अटक ?

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत आता वेगळं वळण पाहायला मिळतय. सूनेने केलेल्या चूकीमुळे जीजी अक्का तिला घराबाहेर काढतात. त्यानंतर घरात एक वेगळच वातावरण निर्माण झालेलं आहे. सूनेला जीव लावूनही तिने केलेला प्रकार जीजी अक्कांना खटकला. आणि म्हणूनच तिला घराबाहेर काढण्यात आलय.

पण यातच आता पोलीसांनी जीजी अक्कांचं घर गाठलय. तेही त्यांना अटक करण्यासाठी. मात्र हे सगळं दुसरी सून कीर्तीसमोर घडतय. कीर्ती पोलीसांना हे करण्यापासून थांबवतेय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या मालिकेच्या प्रोमोमध्ये हे पाहायला मिळतय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

तेव्हा जीजी अक्कांना अटक होण्यापासून वाचवण्यासाठी कीर्ती आता काय पाऊल उचलतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उच्च शिक्षण घेतलेली, आय पी एस व्हायचं स्वप्न बाळगलेली कीर्ती आता आपल्या सासूला वाचविण्यासाठी काय करतेय हे पाहणं रंजक ठरणार आहे. अर्थात ते मालिकेच्या आगामी भागातून समोर येईलच.

Recommended

PeepingMoon Exclusive