'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत आता वेगळं वळण पाहायला मिळणार आहे. एकीकडे न ऐकणारा बबड्या काही सुधरत नाही. तर दुसरीकडे आसावरी आणि शुभ्राचं सासू-सूनेच्या नातं दुरावताना दिसतय. आता आसावरी शुभ्राशी परक्यासारखं वागताना दिसत आहे.
या मालिकेच्या आगामी भागात आसावरी आणि शुभ्राचं नातं तुटताना दिसणार आहे. शुभ्राने गळ्यातलं मंगळसूत्र काढून टाकल्याने शुभ्रा आसावरीला परकी झाल्याचं म्हणते. शिवाय त्यांच्यातलं नातं संपल असल्याचही म्हणते. नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये हे पाहायला मिळतय.
तेव्हा शुभ्रा आणि आसावरीचं हे नातं तुटण्यापासून आता कोण वाचवतय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मालिकेत आलेला हा ट्विस्ट आता या मालिकेत काय नवं वळण घेऊन येतय हे पाहणं रंजक असेल.
या मालिकेचं वेगळेपणं आणि विविध पात्र यामुळे ही मालिका सुरुवातीपासूनच लक्षवेधी ठरतेय. या मालिकेतील आसावरी-शुभ्राची सासू-सूनेची जोडीही लोकप्रिय ठरली. मात्र याच नात्याला आता मालिकेत तडा जाताना दिसत आहे.