पाहा Video : आईसाठी गिफ्ट म्हणून साडी आणण्यामागे बबड्याचं आहे हे कारण

By  
on  

'अग्गंबाई सासूबाई' मालिकेत आसावरीचा बबड्या सुधरण्याचं नाव काही घेत नाही. दिवसेंदिवस विचीत्र वागणाऱ्या बबड्याने आता आणखी एक गोष्ट केली आहे. बबड्याने आई आसावरीला चक्क गिफ्ट म्हणून साडी दिली आहे. आसावरी आणि शुभ्रादेखील हे पाहून आनंदी झाल्या आहेत.

मात्र बबड्याने आसावरीला गिफ्ट दिलेली साडी साध्या फिक्कट रंगाची आहे. हे पाहून शुभ्राने बबड्याला गडद रंगाची साडी द्यायला हवी होतीस असं म्हणते. मात्र यावर बबड्याने दिलेलं उत्तर शुभ्रासह आसावरीलाही दुखावून जातं. अभिजीत राजे घरात नसल्याने आता भडक रंगाच्या साड्या नेसल्यावर लोकं नावं ठेवतील या हेतून बबड्याने आईला साधी साडी घालण्यासाठी हे गिफ्ट देऊ केलं. आणि हेच आहे हे गिफ्ट देण्यामागचं बबड्याचं लबाड कारण.

 

मात्र आसावरील मुलाच्या प्रेमात पुन्हा वाहवत जाताना दिसते मात्र शुभ्रा काही माघार घेणार नाही. शुभ्रा लवकरच अभिजीत यांना पुन्हा घरात आणणार असल्याचं सांगते. तेव्हा आता या मालिकेत पुढे काय घडतय हे पाहणं रंजक ठरेल.

Recommended

Loading...
Share