By  
on  

'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवरची मस्ती, मधुराणीने दिल्या या व्यक्तिला शुभेच्छा

'आई कुठे काय करते' ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेच्या कथेने आणि मालिकेतील विविध पात्रांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे लक्षवेधी ठरतय. या मालिकेतील आईचं मुख्य पात्र साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरलाही या भूमिकेसाठी प्रेक्षकांचं प्रेम मिळतय. 

या मालिकेत दाखवलेल्या परिवाराप्रमाणे ऑफस्क्रिनही हे कलाकार एका कुटुंबासारखे राहतात. सेटवर ऑफस्क्रिनही कुटुंब तयार झालं आहे. या मालिकेचे असोसिएट डायरेक्टर सुबोध बारे यांच्यासोबतही कलाकारांची मस्ती सुरु असते. त्यांच्याच वाढदिवसानिमित्ताने आईची भूमिका साकारणाऱ्या मधुराणीने असोसिएट डायरेक्टर सुबोध यांना सोशल मिडीयावर वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्यासोबतचा सेटवरील फोटो पोस्ट करून खास कॅप्शनही लिहीण्यात आलय.

मधुराणी लिहीते की, "खरंतर आम्ही सेटवर तुझ्या 'दर्जेदार' विनोदांना अशी दाद द्यायला वगैरे येतो बाकी उरलेल्या वेळात कामबीम करतो....तुला तर माहितच आहे...., सुबोध....!!!
असाच हसत हसवत रहा.. सदा आनंदी रहा....! आमचे असो. डायरेक्टर सुबोध बारे ह्यांना जन्मदिवसाच्या लाख शुभेच्छा."

या पोस्टवरून या मालिकेच्या सेटवर कसं खेळतं आणि मनमिळाऊ वातावरण असेल हे पाहायला मिळतय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive