पाहा Video : सौमित्र आणि शनाया एकत्र आल्यावर केला असा गोंधळ

By  
on  

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत आता दिवाळसण पाहायला मिळतोय. ही मंडळी दिवाळी कशी साजरी करत आहेत हे पाहायला मिळतय. यातच दिवाळीत कुणीच एकटं असू नये असं सांगत असते. तर दुसरीकडे सौमित्र आणि शनाया एकत्र आले आहेत.

नुकत्याच प्रदर्शित केलेल्या या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये हे पाहायला मिळतय. सौमित्र आणि शनाया एकत्र आले की कसा गोंधळ करतात हे या पाहायला मिळतय. दोघं एकत्र मिळून गुरु आणि मायाला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीत.

 

यातच सौमित्र आणि शनायाने वेगळा प्लॅन केला आणि गुरु-मायाला प्रचंड घाबरवलय. त्यांच्या दरवाजाजवळ फटाका लाऊन त्यांना चांगलच घाबरवलय. आता शनाया - सौमित्रची ही धमाल जोडी गुरु-मायाला आणखी कसा त्रास देतेय हे पाहणं रंजक ठरेल.

Recommended

Loading...
Share