पाहा Video : सिद्धीसमोर उघडकीस येणार धक्कादायक सत्य

By  
on  

'जीव झाला येडापिसा' या मालिकेत आता वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळतोय. हा मोठा ट्विस्ट मालिकेत वेगळं वळण आणतोय. सिद्धीच्या आयुष्यातील मोठं रहस्य सिद्धीसमोर येऊन उभं राहिलय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या मालिकेच्या प्रोमोमध्ये या ट्विस्ट पाहायला मिळतोय.

सिद्धी शिवाला तिची शपथ घ्यायला लावते आणि हे सत्य शिवाकडून काढून घेते. याचमुळे शिवाला सगळं सत्य बोलणं भाग पडलय. त्यानंतर शिवा जे सांगतो ते ऐकून सिद्धीला धक्का बसतो. कारण शिवा हा आत्याबाई आणि सिद्धीच्या नात्यातील सत्य सगळ्यांसमोर सांगतो. हे सत्य म्हणजे आत्याबाई या सिद्धीच्या आई आहेत. तेव्हा आत्याबाईंना आपली आई म्हणून सिद्धी स्विकारते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

 

सिद्धीसमोर हे सत्य समोर आल्यानंतर आता सिद्धीच्या आयुष्यात काय बदल होणार हे पुढील भागात समोर येईलच.

Recommended

Loading...
Share