By  
on  

पाहा Video : असे चित्रीत करण्यात येतात 'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिकेचे स्टंट्स

'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेला पसंत केलं जातय. अभिनेता विशाल निकम या मालिकेत ज्योतिबांच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेसाठी त्याला बरीच मेहनत करावी लागली आहे. या भूमिकेसाठी लागणारी शरीरयष्टी बनवण्यापासून एक्शन करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी विशाल करतो.

 

सोशल मिडीयावर विशाल मालिकेच्या सेटवरील काही व्हिडीओ पोस्ट करतो. या व्हिडीओत विशालची एक्शन आणि स्टंट्स पाहायला मिळतय. ज्योतिबांच्या भूमिकेत शिरल्यानंतर करावी लागणारी एक्शन आणि त्याची कॅमेऱ्यामागची मेहनत या व्हिडीओंमध्ये पाहायला मिळतेय. 

नुकताच विशालने मालिकेच्या सेटवर वर्कआउट करतानाचा व्हिडीओही शेयर केला होता. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive