By  
on  

पाहा Video : स्वातीसमोर आलं श्रीधरचं कृत्य, मोडणार दोघांच्या नात्याचा आधार ?

'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेत श्रीधरने स्वातीला फसवून तिच्याशी लगीनगाठ बांधली. स्वातीचा विश्वास जिंकण्यात श्रीधर यशस्वी ठरला. मात्र आता श्रीधरचं सत्य स्वातीसमोर आलं आहे. श्रीधरच्या कृत्याची चाहुल स्वातीला लागली. 

यातच श्रीधरचं लग्न झालय हेही स्वातीसमोर आलय. हे सत्य समोर येताच स्वातीला राग अनावर झाला आणि तिने श्रीधरच्या कानशीलात लगावली आहे. हा विश्वासघात स्वातील सहन झालेला नाही. आणि आता श्रीधरच्या कृत्यांचा पाढा वाचला जाणार की काय असं चित्र पाहायला मिळतय. 

 

मात्र सत्य समोर आल्यानंतर श्रीधर आणि स्वातीचं नात मोडेल का ? काय असेल स्वातीचा पुढील निर्णय ? आणि श्रीधर आता पुढे काय करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या खास एपिसोडचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. तेव्हा या मालिकेत पुढे काय वळणं असेल हे पाहणं रंजक ठरेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive