By  
on  

'सूर नवा ध्यास नवा' महिला विशेष पर्वाच्या ऑडिशन्सला होणार सुरुवात

'सूर नवा ध्यास नवा' या लोकप्रिय कार्यक्रमाने मागील अनेक वर्षांपासून प्रेक्षकांची मनं जिंकली. आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदा या कार्यक्रमाचं वेगळं स्वरुप पाहायला मिळणार आहे. यावेळी कार्यक्रमाच हे चौथं पर्व असून 15 ते 30 वयोगटातील मुलिंचं, महिलांचं हे विशेष पर्व असेल..

या नव्या पर्वाच्या ऑडिशन्सची पहिली फेरी 18 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वूटच्या माध्यमातून सुरू होणार आहे. या पर्वात ॲाडिशन्स देऊ इच्छिणाऱ्या 15 ते 30 वयोगटातील मुलींनी आपल्या आवाजातील मराठी ( अत्यावश्यक) व हिंदी गाण्यांचा व्हिडियो वूटवर पाठवायचा आहे. वूट वेबसाईटवर याबाबतची सर्व माहिती उपलब्ध आहे. यातून निवडल्या जाणाऱ्या निवडक गायिकांबरोबर सुरांचं हे अद्वितीय पर्व रंगणार आहे.

 या  कार्यक्रमाचे दोन लोकप्रिय परीक्षक सुप्रसिध्द गायक, संगीतकार अवधूत गुप्ते आणि शास्त्रीय गायकीची परंपरा लाभलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे या स्पर्धकांना मार्गदर्शन करतील. संगीतक्षेत्रातले हे दोन मान्यवर कलावंत ‘सूर नवा ध्यास नवा’ च्या या पर्वातून  महाराष्ट्राच्या नव्या सुरांचा महाराष्ट्राच्या नव्या गायिकेचा शोध घेतील.  लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी पुन्हा एकदा याही पर्वाचं सूत्रसंचालन करेल.  

Author

Recommended

PeepingMoon Exclusive