एकाद्या मालिकेचे काही भाग पूर्ण होतात तेव्हा त्या मालिकेसह संपूर्ण टीमचं श्रेय असतं. झी युवा वाहिनीवरील 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' या मालिकेनही असच खास सेलिब्रेशन केलय. हे सेलिब्रेशन होतं 400 भागं पूर्ण केल्याचं. या मालिकेने नुकतेच 400 भाग पूर्ण केले आहेत.
या मालिकेचे निर्माते सुचित्रा बांदेकर, आदेश बांदेकर आणि सोहम बांदेकर यांनी मिळून या खास सेलिब्रेशनचं आयोजन केलं होतं.
या मालिकेचे 400 भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आदेश बांदेकर यांनी खास पार्टी आयोजित केली होती. या सेलिब्रेशनमध्ये या मालिकेतील संपूर्ण स्टारकास्टसह कॅमेऱ्यामागे काम करणारी टीमही उपस्थित होती.
यावेळी मालिकेतील कलाकारांनी काळ्या रंगाचा ड्रेस कोड परिधान केला होता. या मालिकेतील अभिनेत्री गौरी कुलकर्णी, प्रिया मराठेसह इतर अभिनेत्रींना यावेळी काळ्या रंगाची साडी नेसली होती.