By  
on  

पाहा Video : 'सांग तू आहेस का' मालिकेतील ही अभिनेत्री अशी करते दिवसाची सुरुवात

'सांग तू आहेस का' या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे वैभवीच्या भूमिकेत दिसत आहे. ही वैभवी आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सोशल मिडीयावरही शिवानीला आता वैभवी म्हणून ओळख आहे. वैैभवी साकारणारी शिवानी सोशल मिडीयावर मात्र मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो , व्हिडीओ ती सोशल मिडीयावर पोस्ट करते.

 

शिवानीने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चर्चेत आला आहे. त्याचं कारण म्हणजे या व्हिडीओत शिवानी म्युझीक शिवाय डान्स करताना दिसत आहे.  या व्हिडीओत शिवानीची हटके डान्स स्टाईल पाहायला मिळतेय. 

दिवसाची सुरुवात अशा मोनिका डान्स ने करत असल्याचं शिवानी या पोस्टमध्ये लिहीतेय. शिवाय हा व्हिडीओ शिवानीची इन्स्टाग्रामवरील पहिला रिल व्हिडीओ असून म्युझिक शिवायचं शिवानीने हा व्हिडीओ केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive