By  
on  

‘कारभारी लयभारी’ मालिकेतील अभिनेत्रीला अज्ञातांची मारहाण

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गुन्हेगारी प्रमाण वाढलेलं दिसतंय. अनेक चित्र-विचित्र घटना समोर येत आहेत. कायदा व सुव्यवस्था कितीही कडक असले तरी त्यांची जरब गुन्हेगारांना बसलेली दिसून येत नाही. गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंच आहे. 

छोट्या पडद्यावरची राजकीय पार्श्वभूमीची मालिका ‘कारभारी लयभारी’ मालिकेतील अभिनेत्रीवर अचानक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. 
झी मराठी वाहिनीवर सध्या सुरू असलेली’ ‘कारभारी लयभारी’ या मालिकेत सुरुवातीच्या काही भागात शोना मॅडम व तिची सोबती गंगा दिसून आली होती. आपल्या अभिनयाने छाप पाडणाऱ्या गंगाला एका भयानक अनुभवाचा सामना करावा लागला आहे. गंगा ने स्वतः व्हिडिओ द्वारे ही माहिती देताना खूप घाबरलेल्या अवस्थेत दिसून आली.

गंगाच्या म्हणण्यानुसार ती मुंबईतील एका बस स्टॉप वर बसची वाट पाहत होती. तितक्यात काही मुलांनी विनाकारण तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती घाबरून गेली व तिथून ऑटो मध्ये घराकडे निघाली. वाटेत ऑटो मध्येच तिने लाईव्ह येऊन घाबरलेल्या अवस्थेत पुढे काय करू अशी फॅन्सकडे विचारणा केली.

 गंगा ही तृतीयपंथी असून तिचे खरे नाव प्रणित हाटे आहे. तृतीयपंथी असल्याने तिला लहानपणापासून अगोदरच खूप त्रास सहन करावा लागला होता. आता देखील ती परत याच समस्यांचा सामना करताना दिसून येत आहे.

‘कारभारी लयभारी’ या मालिकेत झळकण्यापूर्वी गंगाने अद्वैत दादरकरसोबत झी युवा डान्सिंग क्वीन या शोचं सहसूत्रसंचालन केलं आहे. सोशल मिडीयावरसुध्दा तिचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. 
 

Recommended

PeepingMoon Exclusive