By  
on  

शेवंता परत येतेय... 'रात्रीस खेळ चाले 3' मधून पुन्हा दिसणार शेवंता

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील थरार, रहस्य या सगळ्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यानंतर या मालिकेचा दुसरा भाग मिळाला अण्णा नाईकांचा दराराही चांगलाच चर्चेत राहिला. त्यानंतर सगळ्यांचं लक्ष वेधलं ते शेवंताने. शेवंता हे पात्र या मालिकेत आलं आणि त्यानंतर अण्णा नाईक आणि शेवंता यांच्या जोडीची चर्चा झाली. अनेक मीम्सही पाहायला मिळाले. 

दोन भागांनंतर आता या मालिकेचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अण्णा परत येणार अशी चर्चा असतानाच मालिकेचे विविध प्रोमो समोर आले. पण अण्णांसोबतच आता शेवंताही पुन्हा भेटीला येत आहे. शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने नुकतच ती परत येणार असल्याची गुड न्यूज तिच्या चाहत्यांना दिली आहे. 

 

अपूर्वाने शेवंताचा रुपातील फोटोही शेयर केला आहे. तेव्हा शेवंताचे चाहत्यांना या बातमीनं आनंद झाला असेल यात शंका नाही. शेवंतानंतर अपूर्वा ही 'तुझं माझं जमतय' या मालिकेतून पम्मीच्या भूमिकेत दिसली होती. मात्र आता पुन्हा एकदा ती शेवंताच्या भूमिकेत परत येत आहे. "पुन्हा एकदा भेटूया ..." असं म्हणत अपूर्वाने चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive