By  
on  

पाहा Video : 'रात्रीस खेळ चाले 3' च्या नव्या प्रोमोत दिसली माईंची झलक, आता माई दिसतात अशा

'रात्रीस खेळ चाले' ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यंदा या मालिकेचा हा तिसरा भाग आहे. तिसऱ्या भागासह अण्णा परत येत असल्याच्या रंगल्या होत्या. त्यानंतर आता मालिकेचे विविध प्रोमो समोर आले आहेत. नव्या प्रोमोमध्ये अण्णांचा आत्मा सगळ्यांना घाबरवताना दिसतोय. तर दुसरीकडे शेवंताही आता परत आल्याचं पाहायला मिळतय.  

यातच नव्या प्रोमोमध्ये माई देखील पाहायला मिळत आहेत. माई वयस्कर झाल्या असून वाडा न विकण्याचं त्या ठरवतात. या वाड्यात त्यांच्या परिवाराच्या आठवणी असल्याचं त्या सांगतात. माईंच्या नव्या लुकने आगामी एपिसोडची उत्सुकता आणखी वाढली आहे. 

 

त्यामुळे नुकत्याच सुरु झालेल्या या मालिकेत प्रेक्षकांना आणखी काय काय पाहायला मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या मालिकेच्या दोन्ही भागांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील विविध पात्र हे चर्चेचा विषय ठरले आणि सोशल मिडीयावरही चर्चेच राहिले. तेव्हा तिसऱ्या भागात कोणती गोष्ट लक्षवेधी ठरतेय हे लवकरच समोर येईल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive