By  
on  

ही मालिका घेतेय प्रेक्षकांचा निरोप, लेखक म्हणतो "माझ्य‍ा काळजाच्या खूप जवळची ही मालिका"

'जीव झाला येडापिसा' ही मालिका 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेच्या शीर्षक गीतापासून मालिकेतील कलाकारांच्या विविध व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. शिवा आणि सिद्धीची प्रेमकहाणी आणि त्यांची जोडीही प्रेक्षकांना भावली. मात्र हा प्रवास आता संपतोय आणि ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

या मालिकेचे लेखक चिन्मय मांडलेकरने सोशल मिडीयावर पोस्ट करून याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. चिन्मय लिहीतो की, "५३५ भागांचा टप्पा पूर्ण करुन जीव झाला येडापिसाचा प्रवास आज थांबतो आहे. माझ्य‍ा काळजाच्या खूप जवळची ही माझी मालिका. पुराशी, कोविडशी लढली. कले कलेनं वाढली. ५ भाषांमध्ये हीच्या आवृत्त्या निघाल्या. त्याही यशस्वी झाल्या. आज हा सगळा प्रवास ‍थांबेल. कधी थांबणार? पेक्षा क‍ा थांबलात? हा प्रश्न कधीही गोड वाटतो. सर्व कलाकार तंत्रज्ञांचं अभिनंदन आणि आभार.तुम्ही जे दिलंत त्यासाठी भरपूर प्रेम आणि आभार. आणि मी तुम्हाला जो त्रास दिला त्याबद्दल क्षमा. खूप खूप आभार. दीपक राज्याध्याक्ष तू दाखवलेल्या विश्वासाबद्दल. आणि मनापासून आभार शिवा,सिद्दी,जलवा,सोनी,आत्याबाई,सरकार आणि संपूर्ण रुद्रायतच्या जगावर प्रेम करणार्‍या रसिकांचे "

 

तेव्हा ही मालिका आता 535 भागांचा टप्पा पूर्ण करून प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. अभिनेता अशोक फळदेसाई या मालिकेत शिवाची भूमिका साकारतो तर अभिनेत्री विदुला चौगुले सिद्धीच्या भूमिकेत दिसली. या  कलाकारांना या मालिकेमुळे प्रेक्षकांचं भरपुर प्रेम मिळालं आणि त्यांचा मोठा चाहतावर्गही निर्माण झाला. आता मालिका निरोप घेत असताना मालिकेच्या संपूर्ण टीमसाठी भावुक क्षण असेल. प्रेक्षकांनाही ही मालिका कायम आठवणीत राहील यात शंका नाही. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive