By  
on  

प्रेक्षकांचा निरोप घेत 'डॉक्टर डॉन'ने शेयर केल्या मालिकेच्या या आठवणी

'डॉक्टर डॉन' या मालिकेने एक वेगळी कहाणी समोर आणून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अभिनेता देवदत्त नागे आणि अभिनेत्री श्वेता शिंदे या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकले. एक गुंड कसा डॉक्टर बनतो आणि त्याचं डॉक्टरीणसोबतचं प्रेमाचं नातं कसं फुलत जास्त असा हा रंजक प्रवास दाखवण्यात आला. या प्रवासाचा आता शेवट झाला आहे. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. 

या मालिकेत डॉक्टर डॉनची भूमिका साकारणारा अभिनेता देवदत्त नागेने यानिमित्ताने त्याच्या भावना सोशल मिडीयावर व्यक्त केल्या आहेत. देवदत्त लिहीतो की, ”डॉक्टर डॉन, झी युवा. खूप जबरदस्त प्रवास होता. प्रेम, भावना, शिकवण. माझ्या संपूर्ण टीमची आठवण येईल. सेलिब्रेशन आणि रात्रीचे शूट मिस करेन. गोंधळी रेस्टो, धमाल मस्ती, एकमेकांशी मस्ती करणं, प्रेम, द्वेष. धन्यवाद झी युवा टीम माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी. धन्यवाद ट्रम्प कार्ड प्रोडक्शन आमची काळजी घेण्यासाठी आणि आधार देण्यासाठी. टेक्निकल टीमचे आभार. आमचा काळजी करणारा परिवार आणि आधार देणारे सगळे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षक. आनंदी शेवट."

याशिवाय देवदत्तने मालिकेच्या काही खास आठवणी शेयर केल्या आहेत. सेटवरील काही मस्ती, ब्रेकटाईममधील टाईमपास दर्शवणारे फोटो त्याने सोशल मिडीया पोस्टमध्ये शेयर केले आहेत.

'जय मल्हार' या मालिकेतून देवदत्त हा खंडोबा देवाच्या भूमिकेत झळकला होता. त्यानंतर या मालिकेतून देवदत्तने एका डॉनची भूमिका साकारली जो डॉक्टर बनतो. याशिवाय कधी न पाहिलेला त्याचा रोमँटिंक अंदाजही पाहायला मिळाला होता.

या मालिकेने आता निरोप घेतल्यानंतर या डॉक्टर डॉन आणि टीमला प्रेक्षक मिस करतील यात शंका नाही. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive