By  
on  

"आदर्श घ्यावा तर तो प्रभू रामचंद्रांकडून", राम नवमीच्या निमित्ताने या अभिनेत्याने दिल्या शुभेच्छा

'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेत अभिनेता विशाल निकम ज्योतिबांची भूमिका साकारतोय. या मालिकेतून विशालला एक वेगळी ओळख मिळाली आहे. सोशल मिडीयावरही विशालचा मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी विशाल विविध पोस्ट करताना दिसतो. नुकतच विशालने खास पोस्ट केली आहे.

श्री राम नवमीच्या निमित्ताने विशालने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र यासाठी त्याने खास फोटो शेयर केले आहेत. विशालने त्याच्या राम रुपातील लुकमधील फोटो शेयर करत रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या पोस्टमध्ये विशाल लिहीतो की, "आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून कारण त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही. श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!"

Author

Recommended

PeepingMoon Exclusive