By  
on  

हेमांगी कवीच्या या मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप

सध्या देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटीयने थैमान घातलं आहे. यामुळे सध्या राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. याचा फटका मनोरंजन विश्वालाही बसतोय. मागील वर्षाप्रमाणे मनोरंजन विश्वाला विविध अडचणींना सामोरं जावं लागत आहे. महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण बंद असल्याने अनेक मालिकांचे चित्रीकरण आता महाराष्ट्राबाहेर होत आहे. हिंदीसह मराठी मालिकांची टीमही आता महाराष्ट्राबाहेरील विविध राज्यात चित्रीकरण करत आहे. मात्र काही वाहिन्या आणि मालिकांच्या टीमल हे करणं शक्य नसल्याने मालिकांचे जुने भाग दाखवले जात आहेत तर काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. यातच एका हिंदी मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

अभिनेत्री हेमांगी कवी आणि शरयु सोनावणे झळकत असलेली हिंदी मालिका तेरी लाडली मै या मालिकेने नुकतच शेवटच्या भागासह प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. सध्या असलेली कोरोनाग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेव्हा स्टार भारतवरील या मालिकेने प्रेक्षकांना अलविदा म्हटलय. 

 

अभिनेत्री हेमांगी कवीनेही याविषयीची माहिती सोशल मिडीयावर दिली. शिवाय प्रेक्षकांचेही आभार मानले आहेत. ती लिहीते की, "आज ही मालिका  'तेरी लाडली मैं' आणि माझी भूमिका उर्मिला निरोप घेत आहोत. तुम्ही  आत्तापर्यंत दिलेल्या प्रेमासाठी आणि आशिर्वादासाठी मी आभारी आहे."

'मुलगी झाली हो' या मराठी मालिकेचं  'तेरी लाडली मैं' हे हिंदी वर्जन होतं. स्टार प्रवाहवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. शिवाय या मालिकेची टीम चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेर जाणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive