By  
on  

पाहायला मिळणार 'सूर नवा ध्यास नवा' कार्यक्रमाचा महाराष्ट्र दिन विशेष भाग

महाराष्ट्र दिनानिमित्ताने टेलिव्हिजीनवर विविध कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यातच सूर नवा ध्यास नवा हा सुरेल कार्यक्रमात या दिवसाची शोभा आणखी वाढवणार आहे. या कार्यक्रमात सध्या एकापेक्षा एक स्पर्धक त्यांच्या सुरेल स्वरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहेत. परिक्षक महेश काळे आणि अवधुत गुप्ते यांच्यासाठीही महिला विशेष सिझन लक्षवेधी ठरतय. 

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 'सूर नवा ध्यास नवा' कार्यक्रमाचा स्पेशल भाग या आठवड्यात पाहायला मिळणार आहे. या खास भागासाठी सूत्रसंचालक स्पृहा जोशीने मराठमोळा लुक केला आहे. या मराठमोळ्या लुकमधील फोटो स्पृहाने शेयर केले आहेत. नऊवारी साडी, नथ, चंद्रकोर अशा मराठमोळ्या लुकमध्ये स्पृहा सुंदर दिसतेय.

याशिवाय परिक्षक अवधुत गुप्ते आणि महेश काळे हे देखील महाराष्ट्र दिन स्पेशल भागासाठी खास पेहरावात पाहायला मिळणार आहेत. या निमित्ताने कार्यक्रमात स्पर्धक खास गाणी सादर करणार आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive