By  
on  

पाहा Video : अग्गंबाई ! सुनबाई आणि सासूबाईने केला असा धमाल डान्स

'अग्गंबाई सुनबाई' मालिकेतील सासू सुनेची जोडी चांगलीच चर्चेत आहे. याआधी 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतील आसावरी आणि शुभ्राच्या जोडीने लक्ष वेधलं होतं. आता या मालिकेतील ही जोडीही सगळ्यांना आवडतेय. अभिनेत्री उमा पेंढारकर यंदा शुभ्राच्या भूमिकेत दिसत आहे. 

सध्या सोशल मिडीयावर डान्स व्हिडीओ हे चर्चेत असतात आणि व्हायरल होताना दिसतात. असाच एक डान्स व्हिडीओ चर्चेत आला आहे. हा डान्स व्हिडीओ दुसरा तिसरा कुणाचा नसून अग्गंबाई सुनबाई मालिकेतील सासू - सुनेच्या जोडीचा आहे. सोशल मिडीयावर सध्या डान्स चॅलेंज हे मोठ्या प्रमाणात केले जातात. या सासू-सुनेच्या जोडीने असाच एक डान्स चॅलेंज केला आहे.

 

आसावरी आणि शुभ्राने या मालिकेच्या शीर्षक गीतावर धमाल डान्स केला आहे. इतर सासू-सुनेच्या जोडींनाही हे डान्स चॅलेंज दिलं आहे. झी मराठी वाहिनीच्या अधिकृत सोशल मिडीया अकाउंटवर हा डान्स व्हिडीओ शेयर करण्यात आलाय. शिवया इतर सासू - सुनांच्या जोडींना हे चॅलेंज देण्यात आलय. "सुनबाई आणि सासूबाई लय भारी. तुम्ही देखील तुमच्या सासूबाई वा सूनबाईंसोबत या गाण्यावर डान्स करून reel बनवा आणि आम्हाला टॅग करा." असं त्यांनी लिहीलय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive