By  
on  

शुभ्राच्या आयुष्यात येणार ही व्यक्ती, या अभिनेत्याची 'अग्गंबाई सूनबाई' मालिकेत नवी एन्ट्री

'अग्गंबाई सूनबाई' या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. या मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. हा ट्विस्ट आहे मालिकेत होणार नवी एन्ट्री. 

लग्नाच्या वाढदिवसाला सोहम आणि सुझेनचं प्रेमप्रकरण शुभ्रासमोर येतं. यामुळे शुभ्राला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे शुभ्रा चक्क आत्महत्या करण्याचा निर्णय घेते. मात्र त्याचवेळी शुभ्रासमोर अनुराग गोखले नावाची व्यक्ती येते. हा अनुराग नेमका कोण आहे ? आणि तो तिला आत्महत्या करण्यापासून वाचवतो का ? हे पुढील भागांमधून समोर येईलच.

मात्र हा अनुराघ कोण साकारणार याची माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता चिन्मय उदगीकरकर अनुरागच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत चिन्मयची नवी एन्ट्री होणार आहे. चिन्मयच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण या मालिकेतून चिन्मयचं झी मराठी वाहिनीवर पुनरागमन होतय. याआधी टनांदा सौख्य़ भरेट या मालिकेतून चिन्मय झी मराठी वाहिनीवर झळकला होता. 

 तेव्हा या मालिकेत चिन्मयची एन्ट्री काय ट्विस्ट घेऊन येतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive