सोशल मिडीयावर ट्रोलिंग आणि नकारात्मक गोष्टींसोबतच काही रिफ्रेशिंग आणि सकारात्मकही पाहायला मिळतं. असाच एक कॉमेडी व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. 'अग्गबाई सूनबाई' या मालिकेतील जोडीचा हा व्हिडीओ आहे. सोहम - शुभ्राची जोडी तशी हटके आहे. नुकतच सोहमचं सुझेनसोबतच प्रेमप्रकरणही आता शुभ्राला कळलय. मात्र नुकताच सोशल मिडीयावर आलेल्या या व्हिडीओने सगळ्यांनाचा हसायला भाग पाडलय.
या व्हिडीओत सोहम आणि शुभ्रा डान्स करताना दिसत आहेत. मात्र डान्स करताना असं काही होतं की सोहम रागावून निघून जातो. बोल न हलके हलके या गाण्यावर दोघं कपल डान्स करताना दिसतात. मात्र गाणं संपल्यानंतर शुभ्रा सोहमला अचानक हलके असं म्हणते, जे ऐकून सोहम तिथून निघून जातो.
सोशल मिडीयावर नेटकऱ्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडलेला दिसतोय. म्हणूनच या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. झी मराठी वाहिनीवरील सोशल मिडीया अकाउंटवर हा व्हिडीओ शेयर करण्यात आलाय.