By  
on  

पाहा Video : 'सुपर डान्सर'च्या मंचावर सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची हजेरी

'सुपर डान्सर' या लोकप्रिय डान्स कार्यक्रमाच्या मंचावर स्पर्धकांचे एकापेक्षा एक डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळतात. या कार्यक्रमाच्या मंचावर अनेक दिग्गज पाहुणे हजेरी लावतात. नुकत्याच काही खास पाहुण्यांनी या मंचावर हजेरी लावली आहे. नुकतीच या डान्स शोमध्ये फ्युजन फोल्क थीम ठेवण्यात आली होती. या थीमवर स्पर्धकांनी बहारदार नृत्य सादर केली. 

यावेळी या कार्यक्रमाच्या मंचावर प्रसिद्ध जोडी अभिनेते सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांनी हजेरी लावली होती. यावेळी स्पर्धकांचे एकापेक्षा एक डान्स परफॉर्मन्स पाहून सचिन-सुप्रियाही थक्का झाले. त्यांनीही मग मंचावर स्पर्धक आणि परिक्षकांसोबत ठेका धरला.

 

या कार्यक्रमाच्या मंचावर अनेक पाहुणे येत असतात. त्यातच सचिन-सुप्रिया यांच्या येण्याने कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली. परिक्षक गीता कपूर, टेरेन्स आणि मलायका अरोरा यांनीही हा खास एपिसोड चांगलाच एन्जॉय केला. लवकरच हा भाग सोनी टिव्ही वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive