By  
on  

'आई कुठे काय करते' मधील अंकिताने केलय संजय लीला भंसाळी यांच्यासोबत काम, जाणून घ्या अभिनेत्री राधाविषयी

'आई कुठे काय करते' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल. यातच या मालिकेला सध्या वेगळं वळण मिळालय. अभिषेकने अंकिताशी लग्न करून सगळ्यांना धक्का दिलाय. अंकिताचं पात्र या मालिकेत आता ट्विस्ट आताना पाहायला मिळतय. अंकिताने अभिषेकला लग्न करण्यासाठी भाग पाडलं आणि आता तिने देशमुख कुटुंबियांच्या घरात एन्ट्री केली आहे. अभिनेत्री राधा सागर ही भूमिका उत्तमरित्या साकारताना दिसत आहेत. या पात्रातील बारकावे तिने सहज सुंदर सादर केले आहेत. 

अभिनेत्री राधाने याआधी बऱ्याच मालिका, नाटक, चित्रपटांमध्ये काम केलय. संजय लीला भंसाळी यांच्या 'मलाल' या चित्रपटात ती झळकली होती. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने भंसाळींसोबत काम केलं होतं. याशिवाय 'ठाकरे', 'नाती खेळ', 'विकून टाक' या चित्रपटांमध्येही ती झळकली आहे. 

एका कॉन्सेस्ट कार्यक्रमातून राधाने या क्षेत्रात एन्ट्री घेतली. त्यानंतर तिने विविध भूमिका साकारल्या आहेत. 2017 मध्ये आलेल्या नाती खेळ या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा आंतरराष्ट्रीय गोल्डन गेट अवॉर्डही मिळालाय. 'एक महानायक - डॉ. बी आर आंबेडकर' या मालिकेतही ती झळकली आहे. 

'आई कुठे काय करते' या मालिकेतून अंकिता या पात्रातून राधा लोकप्रिय ठरतेय. सोशल मिडीयावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. आता या मालिकेत पुढे अंकिता काय खेळी खेळणार ? देशमुख कुटुंबाला आपल्या बाजूने करण्यात ती यशस्वी होईल का ? देशमुख कुटुंब तिला आपलसं करेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive