By  
on  

पाहा Photos : 'येऊ कशी तशी मी नांदायला' मधील नलूचे हे खास लुक पाहीले का ?

येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका आता लोकप्रिय ठरतेय. सुरुवातीपासूनच या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. स्विटू आणि ओमची जोडी तर लोकप्रिय ठरलीच शिवाय या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. स्विटूची आई नलू तर तिच्या हटके अंदाजामुळे चर्चेत आहे. तिचं वागणं, बोलण, राहणीमान यातला साधेभोळे पणा अनेकांना आवडतोय.

अभिनेत्री दिप्ती केतकर या मालिकेत नलूची भूमिका साकारतेय. इतर पात्रांप्रमाणे नलूही प्रेक्षकांना आवडतेय. मालिकेत नलूचे विसकटेलेले केस आणि साडी असा लुक पाहायला मिळतो. मात्र खऱ्या आयुष्यात दिप्ती विविध लुक करून पाहत असते. नुकतेच तिने स्पेक्स लुकमधील फोटो शेयर केले आहेत.

या फोटोंमध्ये दिप्तीने खास स्पेक्स लुक केलाय. हे फोटो तिने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. दिप्तीने आत्तापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलय. या मालिकेतील तिचं पात्रही लक्ष वेधून घेत आहे. सोशल मिडीयावर दिप्तीचा मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

 

याशिवाय दिप्ती या मालिकेच्या सेटवरील अनेक फोटो, व्हिडीओ शेयर करत असते. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive