By  
on  

पाहा Photos : डॉ. अजित कुमार देव आणि डिम्पलची लगीनघाई

एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ही नवी मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली ही मालिका आता वेगळ्या वळणावर आहे. कारण मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. 

अजित आणि डिंपलच्या लग्नाची तारीख जवळ येऊ लागलीय. तर दुसरीकडे दिव्या अजितच्या विरोधात पुरावे गोळा करतेय.

या सगळ्यात अजित मात्र अस्वस्थ आहे. सरू आज्जी देखील हे लग्न होऊ देणार नाही यावर ठाम आहे. आता जशी ह्या लग्नाची उत्सुकता आहे, तशीच देवीसिंगला अटक कधी होणार याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागलीय. तेव्हा डॉ. अजित कुमार सोबत डिम्पल ला सुद्धा पोलीस ताब्यात घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

या डॉक्टराचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर येणार म्हटल्यावर ते पाहणं रंजक ठरणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive