सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरु असल्याने मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर सुरु आहेत. 'आई कुठे काय करते' ही मालिकेचं देखील नवे भाग प्रेक्षकांना पाहता यावे आणि त्यांच्या मनोरंजनात खंड पडू नये यासाठी महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण सुरु आहे. या मालिकेचं सध्या सिल्वासा येथे चित्रीकरण सुरु आहे. सध्या या ठिकाणी पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत.
पावसाच्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्याचा मोह या मालिकेच्या सेटवरील कलाकारांनाही आवरला नाही. या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसलेने लगेचच छत्री हातात घेऊन या पावसाळी वातावरणाचा आणि पावसाच्या सरींचा आनंद लुटला आहे.
रुपालीने काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. अभिनेत्री गौरी कुलकर्णीने हा व्हिडीओ शूट केला आहे. पावसाच्या सरींमुळे रुपालीच्या चेहऱ्यावर गोड हासू आलय. हातात छत्री घेऊन पावसाचा आनंद लुटताना ती दिसतेय.
'आई कुठे काय करते' या मालिकेच्या सेटवरी विविध अपडेट्स रुपाली सोशल मिडीयाच्या माध्यमातून देत असते. या सेटवरील कलाकारांची मैत्री, एकत्र मजा मस्ती ही रुपालीच्या पोस्टमधून पाहायला मिळते. ही मालिका सध्या वेगळ्या वळणावर पाहायला मिळतेय. एकीकडे संजना देशमुख कुटुंबाच्या घरात रहायला आलीय तर दुसरीकडे अभिषेक लग्न करून अंकितालाही घरात घेऊन आलाय. या सगळ्यात मालिकांचे भाग अधीक रंजक होताना दिसत आहेत.