By  
on  

'आई कुठे काय करते' मालिकेतील या कलाकारासोबत रुपाली भोसलेने याआधीही केलय काम, वाढदिवसानिमित्त शेयर केली पोस्ट

आई कुठे काय करते ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. सुरुवातीपासूनच या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. या मालिकेची कथा, पात्रे ही सगळीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यामुळे या मालिकेत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराविषयी प्रेक्षकांना कुतूहल असतं. सोशल मिडीयावरही या कलाकारांनी मोठ्या प्रमाणात फॉलो केलं जात.

याच मालिकेत संजनाच्या भूमिकेत झळकणारी अभिनेत्री रुपाली भोसलेही चर्चेत असते. रुपालीने नुकतीच सोशल मिडीयावर एक पोस्ट शेयर केली आहे. या मालिकेत अप्पांची भूमिका साकारणारे अभिनेते किशोर महाबोले यांच्या वाढदिवसानिमित्ताने रुपालीने ही पोस्ट शेयर केली आहे. 

अप्पा म्हणून फेमस असणारे किशोर यांच्यासोबतचा आरश्यातील हा फोटो रुपालीने शेयर केला आहे. शिवाय किशोर यांच्यासोबत मागील 14 वर्षांपासूनची ओळख असल्याचं ती या पोस्टमध्ये लिहीतेय.

 

रुपाली लिहीते की, "आता 14 वर्षे झालीत आपण एकमेकांना ओळखतोय. माझी पहिली मालिका ज्यात आपण एकत्र काम केलं होतं. आणि आता पुन्हा आपण एकत्र काम करतोय. वाढदिवसाच्या शुभेच्छा. कायम असेच राहा कधीच बदलू नका."

रुपालीने तिच्या पहिल्याच मालिकेत किशोर यांच्यासोबत काम केल्याची आठवण या पोस्टमध्ये शेयर केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive