By  
on  

देवमाणूस मालिकेत अटकेनंतर अजितच्या डोक्यात सुरु झाली नव्या खेळीची समीकरणं

एखादी व्यक्ति ही आपल्याला देवासमान वाटू लागते. मग अशावेळी त्या व्यक्तिचा खरा चेहरा समोर येत नाही. चांगुलपणाचा मुखवटा घालुन दृष्ठ कर्म करणाऱ्या वृत्तीविषयी भाष्य करणारी देवमाणूस मालिका लोकप्रिय ठरेतय. एका गावातील बोगस डॉक्टर लोकांनाचा त्यांच्या स्वभावाने भुरळ पाडतो. आणि अल्पावधीतच गावकरी त्याला देवमाणूस म्हणून संबोधतात. मात्र या देवमाणसाचा खरा चेहरा आता समोर येऊ लागलाय.
 
 भर लग्नमंडपातून अजितला अटक झाल्यानंतर त्याचा झालेला अपमान तो सहन करू शकत नाहीये. या अटकेनंतर झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अजितच्या डोक्तात आता नवं समीकरण शिजू लागलय. यासाठी तो डिम्पलची मदत घेतोय. एकीकडे सगळं गाव डॉ. अजितच्या बाजूने उभं आहे कारण तो गावकऱ्यांसाठी अजूनही देवमाणूसच आहे. पण एसीपी दिव्या तिच्या निर्णयावर ठाम आहे. तिने अजितच्या विरोधातील सगळे पुरावे देखील गोळा केलेत आणि ते ती कोर्टातच सगळ्यांसमोर आणणार आहे. तेव्हा देवमाणूसचा लपलेला खरा चेहरा समोर येणार आहे.
 

या सगळ्यात डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंगच्या खटल्याची कोर्टाची तारीख पडलीय. पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताता संपूर्ण गाव त्याच्यासाठी बाहेर जमलय. यात अजित हा त्याची केस स्वत:च लढणार असं ठरवतोय. दिव्या आणि सरकारी वकील यांना अजितच्या या चतुरपणाची कल्पना येते. तर दुसरीकडे डिम्पलच्या घरातील सगळी मंडळी अजूनही अजितच्या बाजूने उभी आहेत. तर समोर येणारे साक्षीपुरावे पाहून ते देखील संभ्रमात आहेत. आता पुढे यही कोर्टकेस कशी पुढे जाईल, या प्रकरणात नेमका काय निकाल लागेल, देवीसिंगला शिक्षा होणार का ? हे मालिकेच्या पुढील भागांमधून समोर येईल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive