पाहा Video : कीर्ती असं व्यक्त करणार शुभम विषयीचं प्रेम, 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत बहरणार प्रेम

By  
on  

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत आता लवकरच खास वळण पाहायला मिळणार आहे. एकीकडे कुकिंग स्पर्धेमुळे कीर्ती आणि शुभमची जवळीक वाढली आहे. शुभमने ही स्पर्धा जिंकावी यासाठी कीर्ती त्याचाय पाठिशी खंबीर उभी आहे. या स्पर्धेत शुभम एक एक पाऊल हळूहळू पुढे जाताना दिसतोय. जीजी अक्का आणि भाऊ देखील शुभमला या स्पर्धेत पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. तेव्हा या स्पर्धेत पुढे काय घडतय आणि कोण जिंकतय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

मात्र या स्पर्धेदरम्यानच असं काही घडणार आहे जे पाहुन प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसेल. शुभम आणि कीर्ती यांचा प्रेम विवाह नसला तरी दोघांनी या लग्नाच्या संसारात एकमेकांना चांगलच सांभाळून घेतल्याचं पाहायला मिळतय. दोघांना एकमेकांचा आदर तर आहेच पण हळूहळू प्रेम फुलताना पाहायला मिळतय. या स्पर्धे दरम्यान कीर्ती शुभमच्या प्रेमात पडल्याचं पाहायला मिळतय. 

म्हणूनच कीर्ती तिच्या प्रेमाची कबुली शुभमसमोर देणार आहे. यासाठी कीर्ती शुभमला खास अंदाजात प्रपोज करताना दिसेल असं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतय. सुंदर पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये परीसारखी दिसणारी कीर्ती शुभमवर प्रेम असल्याचं त्याला सांगते आणि शुभमही आनंदी होताना दिसतोय. आता हे खरच घडणार आहे का हे पुढील भागांमधून समोर येईलच. कीर्ती शुभम विषयीचं तिच प्रेम कसं व्यक्त करते हे पाहणं मजेशीर ठरेल.

Recommended

Loading...
Share