'जीव माझा गुंतला' मालिकेत झळकणार ही अभिनेत्री, साकारणार महत्त्वाची भूमिका

By  
on  

'जीव माझा गुंतला' ही नवी मालिका 21 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत विविध पात्र पाहायला मिळतील. 'घाडगे एन्ड सून' या लोकप्रिय मालिकेत झळकलेली एक अभिनेत्री या मालिकेतही पाहायला मिळणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे प्रतिक्षा मुणगेकर. 'घाडगे एन्ड सून' मालिकेत प्रतिक्षा कियाराच्या भूमिकेत झळकली होती. आता जीव माझा गुंतला मालिकेतही प्रतिक्षा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. 

या मालिकेत प्रतिक्षा चित्रा खानविलकरच्या भूमिकेत झळकणार आहे. याविषयी प्रतिक्षा म्हणते की,  "खरं सांगायचं तर मला घरी परतल्यासारखं वाटतं आहे. तब्बल तीन वर्षानंतर मी पुन्हा कलर्स मराठीवर मालिका करते आहे आणि टेल-अ-टेल मिडीयाचं प्रॉडक्शन हाऊस आहे, हा एक योगायोगा म्हणावा लागेल. वाहिनी आणि प्रॉडक्शन हाऊसने इतका विश्वास दाखवला आहे त्यामुळे माझी जबाबदारी खूप वाढली आहे असं मला वाटतं. खूप मजा येते आहे सेटवर, तीच लोकं आहेत आजूबाजूला, खुप सकारात्मक वातावरण आहे. त्याच जोमाने काम करणार आहे. ज्याप्राकरे कियारावर प्रेम केलं तसेच चित्रावर देखील करा हीच ईच्छा आहे."

तेव्हा चित्राच्या भूमिकेत प्रतिक्षा काय कमाल करतेय हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.


 
दोन विरुद्ध विचारांच्या, भिन्न स्वभावाच्या व्यक्ती एकमेकांसमोर आल्या तर ? अंतरा आणि मल्हारच्या बाबतीत असच काहीसं घडणार आहे. दोघेही एकमेकांचा तिरस्कार करतात, पण नियती आपला डाव खेळतेच. मल्हार - अंतरा यांना नियती एका सूत्रात बांधते आणि मग कसोटी लागते नात्याची. हे दोघे नियतीवर मात करून पुढचा प्रवास कसा करतील हे  'जीव माझा गुंतला’ मालिकेत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

Recommended

Loading...
Share