By  
on  

या आठवड्यात 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'सोबत रंगणार जागर लोकसंगीताचा  

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून चर्चेत आहे. या संगीत कार्यक्रमातील 14 दमदार स्पर्धक सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसत आहेत. पहिल्याच आठवड्यात या बच्चेकंपनीने सर्वांना थक्क केलं. या छोट्या गायकांसोबतच उत्तम छोटे वादकही या पर्वात पाहायला मिळत आहेत. त्यांच्या सुरेल गाण्यांनी एक वेगळच वातावरण आता लिटिल चॅम्प्समध्ये तयार झालय. या कार्यक्रमाच्या पहिल्याच आठवड्यात कार्यक्रमातील ज्युरी म्हणजेच रोहित राऊत, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि कार्तिकी गायकवाड यांच्यासाठी परिक्षण करणं हे मजेशीर ठरल्याचं पाहायला मिळालं. 

 या आठवड्यात मात्र या कार्यक्रमाच्या मंचावर लोकसंगीताचा जागर होणार आहे. मुंबईची स्वरा जोशी म्हणजे या कार्यक्रमात परिक्षकांचा रव्याचा लाडू अशी ओळख असलेली स्वरा धमाकेदार परफॉर्मन्सनी सगळ्यांना क्लीन बोल्ड करणार आहे.

शेजारणीने बरं नाही केलं ग बया या गाण्याने स्वरा या आठवड्यात सगळ्यांची मनं जिंकणार आहे. परिक्षक देखील या गाण्याने प्रभावित झाले आहेत. स्वरासह इतर स्पर्धकही प्रेक्षकांची आणि परिक्षकांची मनं जिंकणार आहेत. 

तेव्हा यंदाचा 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'चा हा लोकसंगीत जागर विशेष आठवणा लक्षवेधी ठरेल यात शंका नाही.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive