By  
on  

पाहा Video : आजोबांच्या हट्टापायी आपल्या तत्त्वांना मुरड घालेल का आसावरी?

लोकप्रिय मालिका 'अग्गबाई सूनबाई' मध्ये आता एक विलक्षण वळण आलं आहे. सोहम आणि सुझेनच्या अफेअरबद्दल आसावरीला कळल्यावर आसावरी त्या दोघांनाही घराबाहेर काढते, इतकंच नव्हे तर आसावरी त्या दोघांना ऑफिसमधून देखील बेदखल करते. या सगळ्या प्रकरणानंतरही सोहमला स्वतःची चूक कळत नाही.

सोहम सुझेनच्या घरी रहायला गेल्यावर तिच्या घराची अवस्था बघून परत आपल्या घरी जायला पाहिजे असं ठरवतो. मग घरात परत शिरण्यासाठी सोहम नवी युक्ती लढवतोय. आसावरी तर त्याला परत घरात घेणं शक्य नसल्याने सोहम आता आजोबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून डाव साधणार आहे.

आजोबा घरी येतात तेव्हा सोहम बद्दल विचारतात. घरातले सगळे तो कामासाठी बाहेर गेल्याचं खोटं कारण देतात. पण सोहमला आसावरीने घराबाहेर काढल्याचे आजोबांना बबडूकडून कळतं आणि आजोबांना चक्कर येते. आजोबा आसावरीकडे सोहमला परत घरी आणायचा हट्ट करतात. पण शुभ्राला न्याय मिळवून देण्यासाठी आसावरीने हे उचललेलं हे पाऊल आजोबांमुळे मागे घेईल का?  आजोबांच्या हट्टापायी आसावरी आपल्या तत्त्वांना मुरड घालेल का? हे आगामी भागातून समोर येईलच.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive