अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्यावर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रंग माझा वेगळा या मालिकेतून सौंदर्या इनामदार या भूमिकेतून त्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सुरुवातीला या मालिकेत खलनायिका साकारणाऱ्या हर्षदा यांची भूमिका आता मालिकेत वेगळ्या वळणावर पाहायला मिळतेय.
याआधीही हर्षदा खानविलकर यांनी खलनायिका म्हणून काम केलय. पण फक्त अभिनेत्री म्हणूनच नाही तर हर्षदा खानविलकर यांनी कॉश्यून डिझायनर म्हणूनही काम केलय. महाविद्यालयीन दशेत त्यांनी कायद्याचं शिक्षणही घेतलय. साडे माडे तीन, चेकमेट, दुनियादारी, झक्कास, प्यार वाली लव्ह स्टोरी, स्माईल प्लिज यासारख्या प्रसिद्ध मराठी चित्रपटांसाठी त्यांनी कॉश्यूम डिझायनर म्हणून काम केलय.
'दर्द' या हिंदी मालिकेतून हर्षदा खानविलकर यांनी अभिनय विश्वात पदार्पण केलं होतं. सुरुवातीच्या काळात त्यांनी 'ऑल द बेस्ट', 'घरकुल', 'दामिनी', 'आभाळमाया' या मालिकांमध्ये काम केलय. त्यानंतर विविध मालिकांमध्ये त्या झळकल्या आहेत. 'पुढचं पाऊल' या मालिकेतून तब्बल 4 ते 5 वर्षे त्यांनी साकारलेली अक्कासाहेब ही भूमिका लोकप्रिय ठरली. नवरा असावा तर असा या फॅमिली कार्यक्रमातून त्यांनी सूत्रसंचालन देखील केलय.
मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात त्या पाहुणे स्पर्धक म्हणून दिसल्या होत्या. त्यानंतर घाडगे एन्ड सून मालिकेतही त्यांनी इन्स्पेक्टर सौदामिनी हे पात्र साकारलं होतं. रंग माझा वेगळा या मालिकेतून सौंदर्य इनामदार या भूमिकेतून त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत.
मालिकांमधील हर्षदा खानविलकर यांचा पेहराव आणि लुक कायम लक्षवेधी ठरलाय. मालिकांमधील हा लोकप्रिय चेहरा काही मराठी चित्रपटांमध्येही झळकला आहे.