By  
on  

पाहा Video : गँगस्टर फिल्ममध्ये काम करण्यासाठी तयार आहे विराजस कुलकर्णी, शेयर केला व्हिडीओ

'माझा होशील ना' या मालिकेत सध्या वेगळं वळण पाहायला मिळतय. विविध थरारक सीन्सही या मालिकेत सध्या अनुभवायला मिळत आहेत. त्यामुळे चित्रीकरण करायालही कलाकारांना आणखी मजा येत असल्याचं पाहायला मिळतय. या कलाकारांच्या सोशल मिडीयावर पोस्टवरुन सेटवरील अनेक गोष्टी समोर येत आहेत.

अभिनेता विराजस कुलकर्णीने नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. आदित्य म्हणून लोकप्रिय असलेला विराजस आता गँगस्टर फिल्म करण्यासाठी उत्सुक दिसतोय. याचं कारणही तसं आहे. विराजसने पोस्ट केलेल्या व्हिडीओत तो रक्ताच्या थारोळ्यात भिजलेला त्याचा शर्ट आणि हातात बंदूक असा त्याचा अवतार पाहायला मिळतोय. हा व्हिडीओ पाहुन एखाद्या क्राईम सीनची नक्की आठवण येईल असा हा व्हिडीओ आहे. 

 

या व्हिडीओपेक्षाही विराजसने या पोस्टमध्ये लिहीलेलं कॅप्शन महत्त्वाचं आणि लक्षवेधी ठरतय. विराजस लिहीतो की, "गँगस्टर फिल्मच्या ऑडिशनसाठी तयार आहे. " 

तेव्हा आगामी काळात कधी विराजस गँगस्टर फिल्ममध्ये झळकला तर नवल वाटु नये. हा गमतीचा भाग असला तरी मालिकेतील विविध वळणावर थरार वाढताना दिसतोय. कमी कालावधीतच या मालिकेला प्रेक्षकांचा चागंला प्रतिसाद मिळाला. सई-आदित्यची जोडीही पसंत केली गेली. आगामी काळात या मालिकेत आणखी काय ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive