'माझा होशील ना' ही लोकप्रिय मालिका आता एका रंजक वळणावर आल्याचं पाहायला मिळतय. या मालिकेच्या मागील भागांमध्ये जेडीने आदित्यवर हल्ल्याचा प्रयत्न केला आणि त्यातून आदित्य सुखरुप बचावला. तरी आदित्यला आता त्याच्या भूतकाळाबद्दल आणि खऱ्या ओळखीबद्दल कळायला हवं असं त्याच्या मामांना वाटतय. आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजच्या मालकाच्या खुर्चीत आदित्यला बसवण्यासाठी ब्रम्हेंनी एक पत्रकार परिषद ठेवली आहे. यात आदित्य देसाईची ओळख करुन देणं हा महत्त्वाचा हेतू आहे.
या सगळ्या गोष्टींबद्दल सई - आदित्यला मात्र काहीच कल्पना नाही. या सगळ्यात काहीतरी घोळ असल्याची भिती या दोघांना आहे. एवढच नाही तर आता या पत्रकार परिषदेत एक नवाच आदित्य देसाई अवतरतो. त्याचा या कंपनीवर हक्क असल्याचं तो सांगू लागतो.
आता या दोन आदित्य देसाईंमधील खरा आदित्य देसाई कोण आणि हा तोतया नेमका कोण आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. या सगळ्यात आदित्यला सगळं सत्य कळेल का ? आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजच्या मालकाच्या खुर्चीत बसवण्यात मामा यशस्वी होतील का ? हे आगामी काळात पाहणं महत्त्वाचं ठरेल. 'माझा होशील ना' मालिकेत आलेले हे नवे ट्विस्ट पाहणं महत्त्वाचं ठरतय.