'हास्यजत्रे'च्या मंचावर आली 'अजूनही बरसात आहे' मधील मीरा-आदिराजची जोडी

By  
on  

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमात अनेक पाहुणे मंडळी येत असतात. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या कार्यक्रमाच्या मंचावर यंदा खास पाहुण्यांनी हजेरी लावली होती. अजूनही बरसात आहे या नव्या मालिकेतील मीरा आणि आदिराज म्हणजेच अभिनेता उमेश कामत आणि मुक्ता बर्वे या कार्यक्रमात पाहुणे म्हणून हजर होते. 

 आता प्रत्येक रविवार हा कॉमेडीचा डबल बार असणारेय कारण दर रविवारी हास्यजत्रा हा कार्यक्रम तब्बल 2 तास अनुभवता येणार आहे. मालिकेच्या प्रमोशनसाठी पोहोचलेले उमेश आणि मुक्ता हे विनोदवीरांची कॉमेडी पाहुन पोट धरून हसले आहेत.आगामी भागात उमेश आणि मुक्ताची जोडी या मंचावर पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमातील विनोदवीरांची कॉमेडी पाहुन उमेश-मुक्ताच्या काय प्रतिक्रिया असतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

या आठवड्यात ओंकारने त्याच्या आजोबांच्या नावाचं एक माकड घरी आणलं आहे आणि त्यांनी माकडाचे खेळ देशविदेशात करण्याचं ठरवलय. आता या माकडाचे खेळ आणि ओंक्याचा करियर प्लॅन यांनी मंचावर काय हास्यधुमाकूळ उडतो हे बघण्यासारखं आहे. गौरव आपल्या कवितांचा संग्रह चौघुले काकांकडे वाचायला घेऊन आला आहे. चौघुले काका आता या लेखनात काय त्रुटी काढतील आणि त्यांनी काय हास्यकल्लोळ होईल हे बघण्यासारखं असेल. 

Recommended

Loading...
Share